26 June, 2009 10:59:00 PM
इन्फोसिस या ख्यातनाम संस्थेचे अध्यक्ष आणि संगणक तज्ज्ञ नंदन निलकेणी यांची पंतपधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एका आव्हानात्मक देशव्यापी कामगिरीसाठी निवड केली असून ते ती समर्थपणे पार पाडतील यात शंका नाही.
26 June, 2009 07:40:00 AM
यंदा खरे तर केरळमध्ये मान्सून वेळापत्रकापेक्षा एक आठवडा आधीच आला होता. मुंबईतही तो वेळेआधीच येईल आणि पावसाळी कामे पूर्ण न झाल्याने मुंबई पुन्हा जलमय होईल, असे समजून महापालिका आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यात दोषारोपांची जुगलबंदीही झाली. पण बंगालच्या उपसागरात उद्भवलेल्या ‘ऐला’ वादळाने मान्सूनला अरबी समुद्रातच रोखल्याने जून महिना जवळपास कोरडाच गेला. ...
25 June, 2009 07:30:00 AM
इराणमध्ये लोकशाही असल्याचा (गैर)समज असलेल्यांनाही निवडणुकीचे हे नाटक पचनी पाडणे अवघड गेले. साहजिकच जनमताचा उद्रेक होऊन तेथे नव्या अराजकाला जन्म दिला आहे. ...
23 June, 2009 08:50:00 PM
तुर्कस्तानात केमाल अतातुर्क पाशाने १९२० च्या दशकात बुरखा किंवा हिजाबवर बंदी घातली. इतकेच नव्हे, तर मुस्लिम समाजात अनेक सुधारणा राबवून आपल्या देशाला युरोपियन देशांच्या तोडीस तोड केले. आज युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळविणारा तुर्कस्तान हा एकमेव मुस्लिम देश आहे.
...
23 June, 2009 07:35:00 AM
इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरून भारताच्या सायना नेहवाल हिने या खेळाच्या सुवर्णकाळाला उजाळा दिला आहे. गेल्या ऑलिंपिक स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारणा-या सायनाला तेव्हा नशिबाने हुलकावणी दिली, परंतु इंडोनेशियन ओपनमधील विजेतेपद जिंकून तिने त्या अपयशाला भूतकाळात लोटून दिले....
22 June, 2009 07:50:00 AM
भारतीय शास्त्रीय संगीत परदेशात, विशेषत: पाश्चिमात्य देशांमध्ये लोकप्रिय करण्यात ज्यांनी प्रारंभापासून मोलाचा वाटा उचलला त्यात अली अकबर खान यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागते.
...
19 June, 2009 09:47:00 PM
गेल्या ३३ वर्षात चलनवाढीचा दर प्रथमच उणे-एक एवढय़ा निचांकी पातळीवर येऊनही महागाई कमी झाल्याचा मागमूस दिसत नसल्याने सर्वसामान्य माणूस चक्रावून गेला नाही तरच नवल! या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर मागील चार वर्षाप्रमाणेच यंदाही साडेआठ टक्के राखण्याचा निर्णय नोकरदार वर्गाला दिलासा देणारा ठरेल हे नक्की....
19 June, 2009 07:55:00 AM
लोकसभा निवडणूक प्रचारात विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिल्यापासून पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा आक्रमक मूड अजून कायम आहे, असे दिसते. कारण रशियातील येकातेरिन्बर्ग येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या वेळी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतल्यावर पत्रकारांच्या उपस्थितीतच त्यांनी झरदारी यांना दहशतवादाबाबत खडे बोल सुनावण्यास प्रारंभ केला....
17 June, 2009 09:17:00 PM
लोकसभा निवडणुकीच्या निकालास एक महिना पूर्ण झाला असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधील मतभेद दिवसागणिक वाढत आहेत. या निवडणुकीतील पराभव भाजपच्या इतका जिव्हारी लागला आहे की त्याचे निमित्त करून दुस-या फळीतील नेते परस्परांना शह-काटशह देण्याचे राजकारण आता उघडपणे खेळू लागले आहेत....
16 June, 2009 08:38:00 PM
राज्यातील रस्ते आणि पुलांचे बांधकाम करणारे कंत्राटदार वाहनचालकांना किती बिनदिक्कतपणे लुटत चालले आहेत, याचा लोकलेखा समितीने पर्दाफाश केला आहे...