10 February, 2012 06:45:00 AM
जागतिक अर्थकारणात तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता म्हणून भारत उदयास येत असला तरी अभ्यासकांच्या मते उपखंडातील त्याच्या राजकीय प्रभावाला गेल्या काही दशकात ओहोटीच लागली असल्याचे दिसून येते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरुद मिरवणाऱ्या भारताला मालदीवसारख्या चिमुकल्या देशावर प्रभाव राखता येऊ नये हे त्याचे उदाहरण.
09 February, 2012 05:55:00 AM
पवारांच्या आधी शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या नेमस्त स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यानेही आणीबाणीच्या काळात अंतर्बाह्य सज्जन म्हणून ओळखले जाणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्र्यंबक सीताराम कारखानीस यांना काँग्रेसमध्ये दाखल करून घेतले होते. याच्याही आधी यशवंतराव चव्हाण यांनी यशवंतराव मोहिते यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाचे आमिष दाखवून तर शंकरराव मोहिते यांना त्यांचा साखर कारखाना मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचा शब्द देऊन काँग्रेसमध्ये आणले होते....
08 February, 2012 05:15:00 AM
प्रियांका गांधी या नेहरू गांधी घराण्याच्या वारसदार असल्या तरी त्या अद्यापपर्यंत राजकारणात सक्रीय नाहीत. एरव्हीही सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर कमी असतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल आणि कौतुकही वाटते. इंदिरा गांधींची नात डिट्टो इंदिरा गांधींसारखीच दिसते, या कौतुकाचा भाग त्यात अधिक असतो.
...
07 February, 2012 06:25:00 AM
एका पाहणीनुसार 1951-52मध्ये शेतमालाच्या खरेदीवर ग्राहकांकडून खर्च केल्या जाणा-या रकमेतली 89 टक्के रक्कम शेतक-यांच्या हातात पडत होती. सध्या ते प्रमाण 34 टक्क्यांवर आले आहे. शेतक-यांकडून तीन ते चार रुपये किलोने घेतला जाणारा कांदा मुंबई-पुण्यात 11 ते 12 रुपये किलोने विकला जातो. म्हणजेच प्रत्येक किलोतले आठ रुपये मधल्या दलालांकडे जातात. हे दलाल नाहीसे केले तर त्या आठ रुपयातले चार रुपये शेतक-यांना आणि चार रुपये सामान्य ग्राहकाला मिळू शकतील....
06 February, 2012 05:30:00 AM
काल 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली, तर उद्या चार्ल्स डिकन्स या इंग्रजीतील अभिजात कादंबरीकाराच्या द्विजन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. ...
06 February, 2012 06:30:00 AM
कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत संघर्ष पेटलेला असताना विलासराव देशमुख यांनी लातूरमध्येही राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटले. राज्यात एकत्र काम करणा-या या दोन पक्षांमध्ये कलगी-तुरा रंगलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुंबई गाठली आणि पत्रकार परिषद घेऊन माध्यमांद्वारे आपल्या लोकांना सबुरीचा सल्ला दिला. काँग्रेसच्या हाताची साथ असेल तरच सत्तेची ऊब मिळेल, हात नसेल तर घडय़ाळ लावणार कुठे हे पक्के ठाऊक असलेल्या पवारांनी काँग्रेस नेत्यांवर वैयक्तिक टीका करू नका असे आवाहन आपल्या नेत्यांना केले....
04 February, 2012 06:45:00 AM
व्यापारासाठीचे मोक्याचे स्थान, ब्रिटिशांनी उभारलेले पायाभूत सुविधांचे इन्फ्रास्ट्रक्चर, देशभराशी संपर्काचे जाळे आणि पूर्वापारपासूनची ख्याती या गुणांच्या बळावर मुंबई हालती-बोलती-चालती आणि व्यापार करती राहीलही- पण ‘स्वप्नांचे शहर’ हा तिचा लौकिक शिल्लक उरणार आहे का?
...
03 February, 2012 06:00:00 AM
पुरोगामी समजला जाणारा महाराष्ट्र अगदी मध्य प्रदेशाबरोबर नसला तरी त्याची कामगिरी फारशी स्पृहणीय नाही. अजूनही हजारामागे 28 बालमृत्यू होतात. प्रत्यक्षात हे प्रमाण अधिकही असू शकते. मेळघाट(अमरावती), गडचिरोली आणि ठाण्यातील मोखाडा येथे गेल्या दोन दशकात कुपोषणाने मोठ्या प्रमाणावर कोवळी पानगळ झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्याच वर्षी राज्य कुपोषणमुक्त करण्याचे आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले. परंतु त्यांच्या घोषणेनंतर भरीव असे काही झाल्याचे ऐकिवात नाही....
02 February, 2012 06:30:00 AM
शरद पवारांनी आपले मंत्रिमंडळ पाडले यात वसंतदादांना फारसे गैर वाटले नव्हते; पण मी स्वत: सरकारचा राजीनामा देत असताना त्यांनी मला तो देऊ दिला नाही आणि नंतर माझे सरकार पाडून स्वत:चे सरकार स्थापन केले. हा माझा विश्वासघात होता, ही खंत दादांना पुढे अनेक वर्षे सलत राहिली; पण हा भाग मुलाखतीत कुठे आलाच नाही. त्यामुळे एकूणच पवार ऐकायला छान-छान पण त्यांची विश्वासार्हता न बोलण्याजोगीच. यापेक्षा दुसरे काय बोलावे?...
01 February, 2012 06:15:00 AM
राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या तोंडावरच बेरोजगारीच्या विषयाला तोंड फोडल्यामुळे राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये रोजगाराचा मुद्दा प्राधान्याने येणे अपेक्षित होते, तसा तो आलाही. भाजपचा जाहीरनामा आणि काँग्रेसचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध झाले आहे. काँग्रेसच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये येत्या पाच वर्षामध्ये राज्यात वीस लाख रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे, तर भाजपने याच मुद्दय़ावर एक कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याची हनुमानउडी मारली आहे....