पहिले पान | संपादकीय | परिदर्शक | ‘युनियन जॅक’ ऑस्ट्रेलियातून उतरणार?

‘युनियन जॅक’ ऑस्ट्रेलियातून उतरणार?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

एकेकाळची ब्रिटनची वसाहत असलेला ऑस्ट्रेलिया हा आता सार्वभौम देश असला, तरी त्याच्या राष्ट्रीय ध्वजावर ब्रिटनच्या ‘युनियन जॅक’ची प्रतिमा आजही फडकते आहे.

ब्रिटिश साम्राज्याचे जोखड भिरकावून स्वतंत्र झालेल्या अनेक देशांना ब्रिटनशी असलेली आपली नाळ पूर्णपणे तोडणे अद्याप शक्य झालेले नाही. बहुतांश देशांनी ब्रिटनशी असलेले राजकीय संबंध कायम राखले असले, तरी त्याच्यावर ते घटनात्मकदृष्टय़ा अवलंबून नाहीत. एकेकाळची ब्रिटनची वसाहत असलेला ऑस्ट्रेलिया हा आता सार्वभौम देश असला, तरी त्याच्या राष्ट्रीय ध्वजावर ब्रिटनच्या युनियन जॅकची प्रतिमा आजही फडकते आहे. ऑस्ट्रेलियातील प्रजासत्ताकवादी लोकांमध्ये त्यावरून बराच असंतोष आहे. आता आपल्या देशाच्या ध्वजावरून ही प्रतिमा काढून टाकण्याच्या मागणीने जोर धरला असून त्यासंदर्भात एक राष्ट्रव्यापी मोहीमच उघडण्यात आली आहे, असे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने नुकतेच प्रसिध्द केले आहे.

 या वृत्तात म्हटले आहे की एका वृत्तवाहिनीवरील लोकप्रिय वृत्तनिवेदक रे मार्टिन याने युनियन जॅकविरोधात मोहीम हाती घेतली आहे. गेल्या मंगळवारीच ऑस्ट्रेलियाने आपला राष्ट्रीय दिवस साजरा केला. त्यानिमित्त या मागणीला पुन्हा जोर चढला आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रध्वजावर युनियन जॅक असणे हे वसाहतवादी मनोवृत्तीचे लक्षण आहे, असे सांगून मार्टिन याने म्हटले आहे की 1901 मध्ये ऑस्ट्रेलिया महासंघाची स्थापना करण्यात आली, तेव्हा हा ध्वज स्वीकारण्यात आला होता. पण आता सार्वभौम असलेल्या देशाने दुस-या देशाच्या ध्वजाची प्रतिमा आपल्या राष्ट्रध्वजावर ठेवणे हे मागासलेपणाचे लक्षण आहे. त्याऐवजी कांगारूची प्रतिमासुध्दा अधिक सुयोग्य ठरेल. कारण तो प्राणी केवळ याच देशात आढळतो. ध्वजावरून युनियन जॅक उतरविण्यात आला, तरी ब्रिटनची राणी (किंवा राजा) ऑस्ट्रेलियाची घटनात्मक प्रमुख असते, त्याचे काय? त्यात बदल घडण्यासाठी घटनादुरुस्ती होणे आवश्यक आहे. कॅनडासह 15-16 देशांची हीच स्थिती आहे. जिब्राल्टर स्पेनला लागून असले, तरी त्याची मालकी आजही ब्रिटनकडेच आहे. त्यामुळे ब्रिटनचे साम्राज्य लयाला गेले, तरी त्याचा प्रभाव अद्याप टिकून आहे, असे म्हणावे लागते.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आता आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0