प्रचारासाठी शाहरुख नॅसडॅकवर
शाहरूख आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आता अमेरिकेत जाणार आहे. अमेरिकेतल्या शेअर बाजाराच्या सोमवारच्या कामकाजाची सुरूवात ‘माय नेम इज खान’चा नायक शाहरूख आणि नायिका काजोल यांच्या हस्ते शेअर बाजाराची घंटा वाजवून करणार आहेत.
पाकिस्तानी खेळाडूंना ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेत खेळू दिले जावे असे मत व्यक्त केल्याने शाहरूख खान याच्या ‘माय नेम इज खान’हा नवाकोरा चित्रपट मुंबईत प्रदर्शित होऊ देणार नाही अशा घोषणा दिल्या जात असतानाच या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. अलीकडे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या ‘प्रमोशन’साठी अनेक वेगवेगळ्या क्लृप्त्या केल्या जातात. संबंधित चित्रपटातील प्रमुख अभिनेत्यांचे कार्यक्रम आयोजित करुन त्यात चित्रपट पाहण्याचे आवाहन केले जात असते. अभिनेते किंवा कलावंत प्रत्यक्ष आपल्या भेटीला असेच या कार्यक्रमाचे स्वरुप असल्याने त्यांचे चाहतेही अशा कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद देतात. शाहरूखने आपल्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी असेच प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या दि. १२ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट देशात तसेच परदेशातही प्रदर्शित केला जाणार आहे. परदेशातही सध्या भारतीय चित्रपट चांगली कमाई करीत असल्याने तेथेही असेच प्रमोशनचे कार्यक्रम आयोजित केले जात असतात. त्यामुळे शाहरूख आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आता अमेरिकेत जाणार आहे. अमेरिकेतल्या शेअर बाजाराच्या आज(सोमवार)च्या कामकाजाची सुरूवात ‘माय नेम इज खान’चा नायक शाहरूख आणि नायिका काजोल यांच्या हस्ते शेअर बाजाराची घंटा वाजवून करणार आहेत. ‘नॅसडॅक’ या अमेरिकेच्या शेअर बाजाराची दररोजच्या कामाची सुरूवात घंटा वाजवूनच होत असते. येत्या १२ फेब्रुवारीला मात्र ‘नॅसडॅक’ शेअर बाजाराच्या कामकाजाच्या सुरूवातीस केला जाणारा घंटानाद या दोन्ही अभिनेत्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे वृत्त द एशियन एज या दैनिकाने दिले आहे. मुंबई,पुणे, औरंगाबाद या शहरात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध होतो आहे. भारतात या विरोधामुळे आपला चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचणी आल्या तरी त्याद्वारे मिळणाऱ्या अपेक्षित उत्पन्नात घट होऊ नये यासाठी शाहरूखचा हा खटाटोप सुरू आहे.Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
‘मास्को’ द ड्रामा
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा