असा हा सरकारी पाहुणा!
शंकर मेहता हा भीक मागून केवळ जगतो असे नाही तर तो आरामदायी जीवन जगतो. आलिशान जीवनाची त्याला हौस नव्हे लालसा आहे.
बेगर्स कॅन नॉट बी चूजर असे म्हटले जात असले तरी हा भिकारी चूजरही आहे. त्याची कहाणीच वेगळी आहे. शंकर मेहता हा भीक मागून केवळ जगतो असे नाही तर तो आरामदायी जीवन जगतो. आलिशान जीवनाची त्याला हौस नव्हे लालसा आहे. रस्त्यावर लोकांपुढे हात पसरीत असला म्हणून काय झाले तो चंडीगढच्या सरकारी विश्रामगृहात राहतो. राहण्याच्या खोलीचे भाडे देखील भरतो. रंगीत टी.व्ही. संच, व्ही. सी.डी प्लेअरवर सिनेमा बघतो. आधुनिक सुख-सुविधांची त्याला आवड आहे.
या सर्व बाबींची चर्चा शंकर मेहताच्या अटकेनंतरच सुरू झाली. डीएनए वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीनुसार 52 वर्षे वयाच्या मेहताला पोलिसांनी गुरुवारी सेक्टर 42 मधील सरकारी अतिथीगृहातून ‘प्रिव्हेन्शन ऑफ बेगरी अॅक्ट’खाली अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्या रंगिल्या जीवनाची अनेकांना माहिती झाली. मेहता उर्फ मेहतो हा मुळचा रायपूरचा. गेल्या दोन महिन्यांपासून तो सरकारी विश्रामगृहात मुक्काम ठोकून आहे. 6000 रुपये भाडेसुध्दा त्याने भरले. त्याच्याकडे तीन हजारांची रोकड आणि मोबाईल फोन आढळून आला. त्याची ही अटक काही पहिलीच नाही. दोन वर्षापूर्वी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याला त्याची चिंता नाही. भीक मागण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही असा त्याचा दावा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर याआधी चंडीगढ आणि सिमल्यातील ब-याच हॉटेलांत अन् रिसॉर्टमध्ये राहिला आहे. लहान असतानाच आपण आपले गाव म्हणजे रायपूर सोडले, भीक मागूनच उपजिविका सुरू केली, नंतर कधीही अडचण आली नाही असे तो सांगतो. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्याकडे मोबाइल फोन, रंगीत चित्रवाणी संच, व्ही.सी.डी. प्लेअर इत्यादी छानशौकीच्या वस्तू आढळल्या.ंMarathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
‘मास्को’ द ड्रामा
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा