पहिले पान | संपादकीय | राजकीय सदरे

राजकीय सदरे

तलवारी तर परजल्या, आता प्रतीक्षा खणखणाटाची

19 January, 2012 05:30:00 AM
सध्या तरी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या तलवारी परजून ठेवल्या आहेत. जेव्हा पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, नारायण राणे, राज ठाकरे, अजित पवार आदी नेते प्रचाराच्या मैदानात उतरतील तेव्हा तलवारींना तलवारी भिडून खणखणाट सुरू होईल आणि ठिणग्याही पडू लागतील.

परळीत मुंडेकाका हरले त्याची कथा

29 December, 2011 06:30:00 AM राजकीय नेते अनुभवाने परिपक्व होतात; पण गेली जवळपास चाळीस वर्षे राजकारणात मुशाफिरी करणारे गोपीनाथ मुंडे अजूनही जनसंघाच्या काळातील पणतीच्या उजेडापलीकडे जाऊ नयेत, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही....
आणखी वाचा

बेहिशेबी संपत्तीच्या वादात मैत्रीचा बळी?

24 December, 2011 06:30:00 AM तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि त्यांची जिवाभावाची मैत्रीण शशिकला यांच्या गेल्या वीस वर्षाच्या मैत्रीला सध्या ग्रहण लागले आहे. जयललिता यांच्या हृदयात आणि घरातही मानाचे स्थान मिळवलेल्या शशिकला यांना जयललिता यांनी नुकतेच पक्षातून आणि आपल्या घरातूनही हद्दपार केले आहे. त्यांच्यात आलेला हा दुरावा केवळ देखाव्यासाठीच तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते आहे....
आणखी वाचा

भाऊबंदकीमुळे द्रमुक फुटीच्या उंबरठय़ावर

29 July, 2011 06:40:00 AM नेतृत्व करण्याची इच्छा असो वा नसो, करुणानिधी यांच्यावर वयानेच निवृत्ती लादली आहे. हाती सत्ता असेल तर पक्षांतर्गत वा कौटुंबिक वादळे थोपवून धरता तरी येतात पण आता राज्यातील सत्ता संपली आहे. आणि केंद्रात असलेल्या दोन-चार मंत्रिपदांवर टु-जी स्पेक्ट्रमचे भूत स्वार झाले आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याचे बिकट आव्हान करुणानिधी यांच्यासमोर आहे....
आणखी वाचा

नितीन गडकरी यांचे सोयीचे राजकारण

28 July, 2011 06:30:00 AM राजकीय नीतिमूल्ये जपणारा पक्ष म्हणून भाजपकडे लोक आदराने पाहायचे पण आता येडियुरप्पापासून नितीन गडकरींपर्यंत सारेच भाजपवाले नीतिमूल्यांचा चोळामोळा करून वावरताना दिसतात तेव्हा निर्ढावलेल्या येडियुरप्पा यांची जागा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या आसनावर नव्हे तर तिहार जेलमध्ये राजा यांच्या शेजारच्या बराकीत असायला हवी असेच म्हणावे लागते....
आणखी वाचा

भ्रष्ट आचार सोडणे हाच भ्रष्टाचारावर उपाय

12 March, 2010 04:35:00 AM भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी जागतिकस्तरावर चर्चा आणि पाहणी होत असते. कोणता देश भ्रष्टाचारात आघाडीवर आहे आणि त्या देशातील कोणत्या खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार चालतो याचे अहवाल नेहमीच प्रसिद्ध होत असतात. देशात पोलिस खात्याचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. त्या पाठोपाठ सार्वजनिक बांधकाम, महसूल खात्याचा क्रमांक लागतो. या सर्व बातम्या आता नेहमीच्याच झाल्याने आपणही त्याबाबत फारसा विचार करीत नाही. बातमी वाचल्यानंतर काही काळ अस्वस्थ व्हायला होते. भ्रष्टाचार मोडून काढला पाहिजे, असे तावातावाने बोलले जाते. दोन-चार तासात आपण हे सारे विसरून आपापल्या कामात मग्न होतो. ...
आणखी वाचा

क्षमतेपेक्षा उपद्रवमूल्यच प्रभावी

09 July, 2009 01:50:00 AM शरद पवार यांची ताकद खूप मोठी आहे, हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे त्यांच्यासारखे दुसरे नेतृत्व नाही. परंतु त्यांच्यावरचा आक्षेप आहे, तो म्हणजे त्यांनी आपली पूर्ण क्षमता राज्यासाठी वापरली नाही. त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांचे उपद्रवमूल्यच अधिक चर्चेत राहिले....
आणखी वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणातील `पॉवर' पॉइंट

08 July, 2009 09:15:00 AM गेली तीस वर्षे शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. कुठल्याही अंगाने महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा करायची झाली, तरी पवारांशिवाय ती करता येत नाही. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तरी निवडणुकीच्या आधी आणि नंतरही महाराष्ट्राच्या राजकारणात ’पवार’ हाच ‘पॉवर पॉईंट’ राहणार आहे....
आणखी वाचा

राहूल गांधी नावाची जादू आणि युवा फौज

17 June, 2009 08:50:00 PM राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाला नवजीवन देताना देशातील युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले. उत्तर प्रदेशात मोठय़ा प्रमाणात युवक समाजसेवेत उतरले. वर्ष दोन वर्ष राहुल गांधींनी नियोजनपूर्वक उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब पिंजून काढला आणि तिन्ही राज्यांत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आक्रमक निर्णय घेतला. परंतु हा आक्रमक निर्णय राहुल गांधींनी तेव्हा घेतला नसता तर आज काँग्रेस सुस्थितीत पोहोचलीच नसती....
आणखी वाचा

तीन नेत्यांच्या तीन त-हा

13 June, 2009 07:50:00 AM पराभवाचा धसका भाजपच्या नेत्यांनी एवढा घेतला आहे की, आपण नेमके पराभूत कशामुळे झालो याचा एकत्रित विचार करण्याचीही त्यांची हिंमत होत नाही. प्रत्येक नेत्याने पराभवाची जबाबदारी कोणावर टाकायची, हे मात्र आपल्यापुरते ठरवून टाकले आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांचा आधार घेतला जात आहे....
आणखी वाचा
1 2 next total: 17 | displaying: 1 - 10