सारांश

प्रियांका आणि उत्तरेतले चोर

08 February, 2012 05:15:00 AM
प्रियांका गांधी या नेहरू गांधी घराण्याच्या वारसदार असल्या तरी त्या अद्यापपर्यंत राजकारणात सक्रीय नाहीत. एरव्हीही सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर कमी असतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल आणि कौतुकही वाटते. इंदिरा गांधींची नात डिट्टो इंदिरा गांधींसारखीच दिसते, या कौतुकाचा भाग त्यात अधिक असतो.

उत्तरेतल्या जनतेला लबाडाघरची आवतणी

01 February, 2012 06:15:00 AM राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या तोंडावरच बेरोजगारीच्या विषयाला तोंड फोडल्यामुळे राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये रोजगाराचा मुद्दा प्राधान्याने येणे अपेक्षित होते, तसा तो आलाही. भाजपचा जाहीरनामा आणि काँग्रेसचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध झाले आहे. काँग्रेसच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये येत्या पाच वर्षामध्ये राज्यात वीस लाख रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे, तर भाजपने याच मुद्दय़ावर एक कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याची हनुमानउडी मारली आहे....
आणखी वाचा

सांस्कृतिक मांडवात उपरे राजकारण

25 January, 2012 06:30:00 AM कोटींची उड्डाणे घेणारे संमेलन उभे करण्यासाठी राजकीय नेत्यांचीच मदत लागते. त्यांच्याशिवाय संमेलन उभे राहू शकत नाही ही वस्तुस्थिती असताना राजकीय नेत्यांनी मंचावर येऊ नये, असे म्हणणे कृतघ्नपणाचे आहे. ज्यांना कुणी दहा रुपयांची वर्गणी देणार नाही, अशी मंडळी राजकीय नेत्यांना संमेलनात विरोध करतात. एकीकडे अशी टोकाची भूमिका घेणारे आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या पायावर लोळण घेणारे किंवा त्यांची भाटगिरी करणारे. साहित्यिकांमध्ये असे दोन वर्ग पाहायला मिळतात....
आणखी वाचा

पवारांचा कबुलीनामा, मुंडेंचा गृहकलह वगैरे

18 January, 2012 06:30:00 AM कौटुंबिक वादात रस घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासला आहे. अजित पवार यांचा वैचारिक वकुब पाहता त्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. परंतु शरद पवार यांनी ठरवले असते तर यातल्या अनेक बाबी टाळू शकले असते. अजित पवार यांच्या सत्ताकांक्षेपुढे शरद पवार यांचा धृतराष्ट्र झाला आहे, हेच यावरून दिसून येते....
आणखी वाचा

अण्णांच्या आंदोलनापुढचे अडथळे कोणते?

11 January, 2012 06:30:00 AM गर्दी, ही अण्णांची ताकद कधीच नव्हती. अण्णांनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ सत्याग्रहाच्या बळावर. पूर्वी कधीही त्यांनी गर्दी जमवून दबावतंत्र वापरले नव्हते. उपोषण हेच त्यांचे हत्यार होते आणि आजही आहे. दिल्लीतील टोळक्याच्या नादी लागून त्यांनी सत्याग्रहाची गर्दीशी सांगड घातली आणि तिथेच त्यांनी राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या पराभवाची पायाभरणी केली. ...
आणखी वाचा

विकलांग आंदोलनाला ‘राजकीय’ संजीवनी

04 January, 2012 05:00:00 AM अनेक जनआंदोलने समर्थपणे हाताळणा-या मेधा पाटकर यांच्या लक्षात अण्णांच्या आंदोलनातील त्रुटी आल्या नसतील, असे कसे म्हणायचे? तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नांसाठी सारी हयात खर्ची घातल्यामुळे आंदोलनाचा चेहरा त्यांना वाचता यायला पाहिजे होता, परंतु अण्णांभोवतीच्या अलोट गर्दीने त्यांनाही भूल पाडली. या आंदोलनापासून काडीमोड घेतला तर एका ऐतिहासिक लढय़ाच्या श्रेयापासून वंचित राहू, अशी भीती त्यांना वाटली असावी....
आणखी वाचा

विकासाला मार्केटिंगची गरज

28 December, 2011 06:00:00 AM विकासाच्या बाबतीत देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. तो आणखी पुढे नेता येईल आणि पुढे असल्याचे जगासमोर पुराव्यानिशी मांडता येईल. त्यासाठी नीट मार्केटिंग होण्याची गरज असून त्याच पातळीवर आपण मार खात असल्याचे दिसून येते....
आणखी वाचा

सीमाप्रश्नी सा-यांचेच धूळफेकीचे राजकारण

21 December, 2011 06:30:00 AM सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी होणार नाही, यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव वाढवला पाहिजे. खरोखर तसा दबाव आणायचा तर भाजपचे महाराष्ट्रातील नेते किंवा शिवसेनाही आणू शकते. बेळगाव महापालिकेच्या बरखास्तीचा निर्णय मागे घ्यायला लावणे, हे त्याचे पहिले पाऊल ठरेल. ...
आणखी वाचा

अण्णांचा अहंकार आणि राहुलचा गांधीमार्ग

14 December, 2011 06:55:00 AM राहुल गांधी यांनी ज्या रितीने देश समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तेवढी संवेदनशीलता स्वातंत्र्योत्तर काळातील कोणत्याही राजकीय नेत्याने दाखवल्याचे दिसत नाही....
आणखी वाचा

आजच्या संदर्भात निळा कोल्हा, गांधीजी वगैरे..

30 November, 2011 06:30:00 AM सोंग असो किंवा मुखवटा - सदासर्वकाळ निभावता येत नाही. त्याला काहीएक कालमर्यादा निश्चितच असते. गांधीजींचे सोंग ही तर महाकठीण गोष्ट. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत, गणपतीच्या मिरवणुकीत, काही मोर्चामध्येही गांधीजींचे सोंग घेतलेली पात्रे भेटतात. पंचा, टक्कल, चष्मा आणि हातात काठी घेतले की झाले गांधीजी. मोर्चा किंवा मिरवणूक संपली की सोंग नंतर कदाचित बार किंवा गुत्त्यामध्येही आढळू शकते....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 121 | displaying: 1 - 10