पहिले पान | संपादकीय | यमुना लहरी

यमुना लहरी

सरते वर्ष कडू आठवणीचेच

27 December, 2011 06:50:00 AM
सरत्या वर्षातील केंद्र सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखाच मांडायचा झाला तर अण्णांच्या आंदोलनापासून ते रिटेल क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीपर्यंतचे निर्णय घेऊनही सरकारची कोंडी झाल्याचेच दिसले. मावळते वर्ष अशा कडू आठवणींचे ठरले. वर्षारंभी राष्ट्रकुल आणि टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाल्यामुळे सरकार ‘बॅकफुट’वर गेले आणि प्रगतीची घोडदौड एकदम थांबली.

उत्तर प्रदेशात हवा राहुल गांधींची

20 December, 2011 06:55:00 AM राहुल गांधींना तळागाळातील लोकांमध्ये लाभणारा प्रतिसाद बघून मायावतींचा जळफळाट होताना दिसतो. जनतेत त्यांच्याविषयी असलेला रोष हा काँग्रेस पक्षासाठी विशेषत: राहुल यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मायावतींच्या निष्क्रिय कारभाराच्या पार्श्वभूमीवर राहुल विकासाचा मुद्दा पुढे रेटून जनमत काँग्रेसच्या बाजूने वळवू शकतात. ...
आणखी वाचा

भाजपचा आटापिटा सत्तेसाठीच

13 December, 2011 06:30:00 AM भारतीय जनता पक्षाला सध्या सत्तेशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देणारे सगळे आपलेच मतदार आहेत असे या पक्षाच्या नेत्यांना वाटते आहे. अण्णांच्या या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन सत्ता बळकावण्याचा या पक्षाचा हेतू असला तरी तो अशा प्रयत्नांनी साध्य होणार नाही हे या पक्षाच्या नेत्यांना कुणीतरी समजावून सांगायला हवे आहे....
आणखी वाचा

`रिटेल'चा निर्णय चुकीच्या वेळी

29 November, 2011 06:30:00 AM ‘रिटेल’संबंधींच्या निर्णयामुळे उद्योगक्षेत्रात त्याविषयी अनुकूल प्रतिक्रिया उमटल्यासुद्धा. परदेशी गुंतवणुकीसाठी भारतीय बाजारपेठ उत्तम आहे असा संदेश यातून विदेशी गुंतवणूकदारांना सरकारने दिला. पण देशातील ‘रिटेल’ क्षेत्राला म्हणजेच छोटय़ा-छोटय़ा दुकानदारांना, त्यांच्या व्यवसायाला या निर्णयाचा विपरित परिणाम भोगावे लागणार नाहीत, हे पटवून देण्यात यश आलेले नाही....
आणखी वाचा

जनचेतना यात्रेचे कवित्व

22 November, 2011 06:30:00 AM परदेशी बँकांत दडवलेले 25 हजार कोटी रुपयांचे काळे धन मी परत आणीन, असे लालकृष्ण अडवाणी यांनी घोषित केले. ‘मी आणीन’ याचा अर्थ काय? सरकारात कुठल्या मोठय़ा पदावर असले तरच त्यांना ते शक्य आहे. परंतु अडवाणी सध्या कुठल्याही सरकारी पदावर नाहीत. पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याचे त्यांचे मनसुबे संघ परिवाराने उधळून लावले आहेत. मग अडवाणी परदेशातील दडवलेला काळा पैसा आणणार तरी कशाच्या बळावर?...
आणखी वाचा

उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीनंतरच फेरबदल

15 November, 2011 06:30:00 AM काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर पक्षात आणि केंद्र सरकारमध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याच्या बातम्यांना गेल्या काही दिवसात ऊत आला आहे. राहुल गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार यात शंका नसली तरी ती कदाचित उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीनंतरच सोपवली जाण्याची अधिक शक्यता आहे....
आणखी वाचा

सरकार आणि काँग्रेसमधील दरी वाढवणारी दरवाढ

08 November, 2011 07:00:00 AM याआधीच जमीन सुधारणा कायद्यावरून तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हाताळण्याच्या पद्धतीवरून पक्ष आणि सरकार यांच्यात मतभेद आहेत. त्यातच पेट्रोलच्या दरवाढीने मतभेदांची आधीच असलेली दरी अधिक रुंदावली आहे....
आणखी वाचा

अडवाणी यांची जनचेतना यात्रा प्रभावहीन

01 November, 2011 06:30:00 AM सरदार पटेलांप्रमाणे अडवाणी यांची निर्णयक्षमता असल्याचा दावा त्यांचे ‘पोल मॅनेजर्स’ करतात. परंतु त्यांच्या या गुणाचा मात्र अनुभव काही आला नाही. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने त्यांना ‘प्रोजेक्ट’ केले पण मतदारांवर ही प्रभाव पडला नाही. अडवाणी यांच्या नावाची जादू आता चालेनासी झाली आहे, याचा साक्षात्कार त्यांच्या पक्षातील नेत्यांना आता होऊ लागला आहे. उशिरा का होईना त्यांना वास्तवाची जाणीव झाली, हेही नसे थोडके. ...
आणखी वाचा

आतातरी कॉँग्रेसने आक्रमक व्हावे

25 October, 2011 07:00:00 AM अण्णा आणि त्यांचे सहकारी संसदेलादेखील तुच्छ समजू लागले आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीगृहाविषयी म्हणजे संसदेविषयी आदर बाळगणे तर दूर; पण संसदेपेक्षा अण्णा हजारे मोठे आहेत, असा दावा करण्यापर्यंत केजरीवाल यांची मजल गेली. घटनात्मक संस्थेचा असा उपमर्द करण्याची भाषा एखादा हुकूमशहाच करू शकतो. देशाच्या राज्यव्यवस्थेला दूषणे देणा-या अशा व्यक्तीला ‘मॅन ऑफ द इयर’ अशा शब्दात पुरस्कृत केले जावे याला काय म्हणावे?...
आणखी वाचा

मार्ग कुठला, म. गांधींचा की नक्षलवाद्यांचा?

11 October, 2011 06:50:00 AM जनलोकपाल विधेयकाची मागणी करताना दुर्दैवाने अण्णा हजारे यांनी तीच भाषा वापरली. आमची मागणी मान्य करा अन्यथा आम्ही काय करू ते बघा, अशी धमकी देऊन त्यांनी मनमोहन सिंग सरकारला धारेवर धरले. अण्णा हजारे यांची ही भूमिका महात्मा गांधींचा अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांची नव्हती तर क्रूर, हिंसक नक्षलवाद्यांसारखी होती. महात्मा गांधी यांचा मार्ग सोडून त्यांना नक्षलवाद्यांसारखा ब्लॅकमेलिंगचा मार्ग अवलंबायचा आहे काय, असा प्रश्न पडतो....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 142 | displaying: 1 - 10