प्रश्न सर्वच जीवनसरितांचा
नद्या स्वच्छ व्हायला हव्यात, त्यांच्या किना-यावरील अतिक्रमणं, अनधिकृत बांधकामं थांबायला हवीत आणि नद्यांच्या पाण्याचा प्रवाह सतत वाहता राहिला पाहिजे. या भूमिकेतून नद्यांच्या संवर्धनासाठी योजना आखण्यात आली आहे. त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, पर्यावरणप्रेमी, जलप्रेमी, निसर्गप्रेमी, संस्था, युवावर्ग सा-यांना एकत्र आणलं जाईल.
गंगा ही राष्ट्रीय नदी आहे. सरकारने ‘गंगा अॅक्शन प्लॅन’ राबवला असला तरी तो पूर्णत: यशस्वी व्हायचा आहे. जी गत गंगेची, तीच महाराष्ट्रातील नद्यांची. राज्यातील प्रत्येक नदीबाबतही ‘अॅक्शन प्लॅन’ राबवायला हवा. मुख्य म्हणजे सरकारी मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येक छोट्या-मोठ्या नदीकाठी वसलेल्या जनतेनंही पिण्याचा पाण्यासाठी या जीवनसरितांना महत्त्व दिलं पाहिजे. गोदावरी असो की मिठी किंवा उल्हास नदी.. प्रदूषणाचा प्रश्न गहन आहे. मुंबईतील महापुरानंतर ‘मिठी’ नावाची नदी आहे, हे लोकांना कळलं. या नद्या स्वच्छ व्हायला हव्यात, त्यांच्या किना-यावरील अतिक्रमणं, अनधिकृत बांधकामं थांबायला हवीत आणि नद्यांच्या पाण्याचा प्रवाह सतत वाहता राहिला पाहिजे. या भूमिकेतून नद्यांच्या संवर्धनासाठी योजना आखण्यात आली आहे. त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, पर्यावरणप्रेमी, जलप्रेमी, निसर्गप्रेमी, संस्था, युवावर्ग सा-यांना एकत्र आणलं जाईल.
गंगाजल फाऊंडेशनने ‘जन जोडो अभियान’ उपक्रमाची तयारी सुरू केली आहे. यात उत्तराखंड ते पश्चिम बंगाल प्रवासात एक कोटी लोकांशी संवाद साधला जाणार आहे. गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसंच गंगेतील जैवविविधतेचं संरक्षण-संवर्धन व्हावं, यासाठी कित्येक वर्ष विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र स्थानिकांच्या सहभागाअभावी त्या अपयशी ठरत आहेत. गंगेचं पावित्र्य अबाधित राखायचं असेल तर स्थानिकांचा सहभागही तितकाच अपेक्षित आणि महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’ गंगोत्रीपासून गंगासागपर्यंतच्या म्हणजेच उत्तराखंड ते पश्चिम बंगाल या भागात ‘जन जोडो गंगायात्रा’ अभियान राबवणार आहे. गंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘गंगा अॅक्शन प्लॅन’ राबवण्यात आलाय. पण ज्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते आहे, त्या लोकांचाच अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही योजना अपयशी ठरली. त्यानंतर केंद्र सरकारने गंगेला ‘राष्ट्रीय नदी’चा दर्जा बहाल केला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. ही समिती गंगेचं प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांवर लक्ष ठेवणार आहे. मात्र याबाबतही स्थानिकांनी अनुत्साह दाखवल्यास केंद्र सरकारच्या माथी पुन्हा अपयशच येणार असल्याने ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’ संस्थेने गंगेकाठी राहणा-या रहिवाशांमध्ये जनजागृती करणारे ‘जन जोडो गंगायात्रा’ अभियान हाती घेतलंय. या अभियानात आमच्यासोबत डॉ. राजेंद्र सिंह, बीबीसी वृत्तवाहिनीचे लघुपट निर्माते ज्युलियन हॉलिक, वीरभद्र मिश्रा, कल्याण रूद्र आदी अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञ सहभागी होतील. ही मंडळी हरिद्वार ते कोलकात्यापर्यंतचा प्रवास बोटीने करून गंगेकाठी वसलेल्या गाव-शहरांवर होणा-या प्रदूषणाच्या परिणामांवर अभ्यास करतील. अभ्यासांतर्गत तयार करण्यात आलेला अहवाल अभियानाच्या अंतिम टप्प्यात केंद्र सरकारकडे सादर केला जाईल. ‘राऊंड द अर्थ सायकलिंग फाऊंडेशन’चाही या अभियानात सहभागी असेल. अभियानांतर्गत गंगेचं इतिवृत्त १२० छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं जाईल. गंगोत्रीपासून गंगासागपर्यंतच्या प्रत्येक गावात, शहरात हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलं जाईल. तसंच माहितीपट, व्याख्यानं, पथनाट्यांच्या माध्यमातूनही गंगेच्या प्रदूषणाबाबत गावागावांत जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा