पहिले पान | दिल से | डॉक्टर ते अ‍ॅक्टर एक प्रवास

डॉक्टर ते अ‍ॅक्टर एक प्रवास

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

सुरुवातीला रोप जसं सरळ रेषेत वाढतं तसचं वाढू लागलो, पण हळूहळू फांद्या फुटायला सुरुवात झाली आणि माझ्यावर प्रभाव टाकणारी प्रत्येक व्यक्ती व्हावंसं वाटू लागलं. अगदी यमाच्या रेडय़ाशी स्पर्धा करणा-या अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरपासून ते जनतेचं कल्याण करायचं की वाटोळं हे ठरवू शकणा-या मुख्यमंत्र्यांपर्यंत.

लहानपणी शाळेत बाईंनी प्रश्न विचारला, मोठेपणी कोण होणार? खेडेगावातील मध्यमवर्गीय कुटुंबात मुलांसाठी जी स्वप्नं पाहिली जातात, त्यातीलच एक आपसूक ओठांवर आलं डॉक्टर. तो विषय तिथेच संपला. प्रश्न मात्र मनात खोलवर रुजला. सुरुवातीला रोप जसं सरळ रेषेत वाढतं तसचं वाढू लागलो, पण हळूहळू फांद्या फुटायला सुरुवात झाली आणि माझ्यावर प्रभाव टाकणारी प्रत्येक व्यक्ती व्हावंसं वाटू लागलं. अगदी यमाच्या रेडय़ाशी स्पर्धा करणा-या अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरपासून ते जनतेचं कल्याण करायचं की वाटोळं हे ठरवू शकणा-या मुख्यमंत्र्यांपर्यंत. शिक्षक, वकील, कलेक्टर हे नेहमीचे टप्पे होतेच, पण एकाच आयुष्यात या सगळय़ांचं जीवन अनुभवता येतं, तो अभिनेता व्हायचं काही मनात नव्हतं. अभिनयाशी अगदी शिशुवर्गात असल्यापासून नातं होतं. पण अभ्यासात नेहमी पहिला नंबर असल्यामुळे अभिनयाचं क्षेत्र करिअर म्हणून निवडण्याचा प्रश्नच नव्हता. दहावी-बारावीला मेरिटमध्ये आलो. मुंबईच्या सेंट जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि स्वप्नांचं क्षितिज रुंदावलं. केईएममध्ये अपूर्वाई नावाची रजनी साकारताना सुबल सरकार आणि डॉ. रवी बापट या दिग्ग्जांची भेट झाली. त्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडली आणि डॉक्टरच्या अ‍ॅप्रनच्या आत दडलेला कलावंत खडबडून जागा झाला. पण सोबत प्रश्नही पडला, डॉक्टर की अ‍ॅक्टर. लिहिताना दोनच अक्षरांचाच काय तो फरक, पण वास्तवात जमीन-आस्मानाचं अंतर होतं. मध्यमवर्गीय कुटुंबात असतं त्याचप्रमाणे माझ्याही घरात भव्यदिव्य या शब्दापेक्षा स्थैर्य या गोष्टीला जास्त महत्त्व होतं. त्यात मेडिकलला पहिल्या वर्षी डिस्टींक्शन मिळाल्याने डॉक्टर आणि अ‍ॅक्टर दोन्हींत उभं द्वंद्व होतं. आईचा पाठिंबा होता तर वडिलांचा विरोध. कसेबसे सहा महिने काढले, पण माझ्यातील कलाकार स्वस्थ बसू देईना. मग पातेल्यातील साय सांभाळत दूध ओतावं तसंच अभ्यास सांभाळत अभिनयाला सुरुवात केली. कामंही मिळत गेली. आपला मुलगा कमालीचं स्थैर्य असलेलं करिअर सोडून कमालीची अस्थिरता असलेलं करिअर निवडतोय, हे पाहून सुरुवातीला धास्तावलेल्या वडिलांचा विरोध हळूहळू मावळला. पण त्याच वेळी त्यांनी एक गोष्ट निक्षून सांगितली. निर्णय सर्वस्वी तुझा आहे. पुढे जाऊन तो योग्य होता, हे तुलाच सिद्ध करायचे आहे. कारण कुठलाही निर्णय चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे, हे सिद्ध करण्याची धमक असावी लागते. एमबीबीएस पूर्ण झाल्यावर अभिनयाचा वारू चौखूर उधळला. कित्येकांनी विचारलं, शिक्षण का फुकट घालवलं? पण मला वाटतं, शिक्षण कधीच वाया जात नाही. शिक्षण हे अर्थार्जनाचं साधन आहे, ही इंग्रजांनी बनवलेली मानसिकता दुर्दैवानं आपण अजून जपली आहे आणि शिक्षण जे व्यक्तिमत्त्व विकासाचं साधन आहे, ही मूळ बाब विसरून गेलो आहोत. आजही मी डॉक्टरी पेशा विसरलेलो नाही. आधी डॉक्टरमधला अ‍ॅक्टर दिसायचा. आता अ‍ॅक्टरमध्ये डॉक्टर दिसतो. डॉक्टर ते अ‍ॅक्टर या प्रवासाचा मनमुराद आनंद लुटतो आहे. आता एका नव्या प्रवाहासाठी तयारी सुरू आहे. अभिनेता बन गया हू, अब नेता बनना है.नवा प्रवास अभिनेता ते नेता. इतिहासातील नेत्याची भूमिका साकारत आहे. आता ती वास्तवात जगायची इच्छा आहे. पुन्हा कधी तरी नक्कीच सांगेन, याविषयी आणि सांगेन तेही दिलसे.      

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (2 पोस्टेड ):

Aparna Shigam on 11 October, 2009 03:21:22 PM
avatar
Hi maliKa khup CHAN aHe...Maharaj khup jawlun kalale ...thanks to Dr.Kolhe.....and star pravah............JAI BHAVANI ...JAI SHIVAJI.!!!!!!!!!!
shivani singasane on 12 November, 2010 08:47:54 PM
avatar
i like it very much .

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
3.00