‘बेक’ केलेले रहस्य?
पुण्याच्या जर्मन बेकरीत गेल्या फेब्रुवारीत झालेल्या बॉम्बस्फोटाचे रहस्य उलगडण्यात अखेर दहशतवाद विरोधी पथकास(एटीएस) यश आले असले तरी हे यश निर्विवाद मानता येणार नाही, कारण ‘सूत्रधार’ सापडल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष बॉम्ब ठेवणारा आणि स्फोट घडवून आणणारा हे दोघेही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
पुण्याच्या जर्मन बेकरीत गेल्या फेब्रुवारीत झालेल्या बॉम्बस्फोटाचे रहस्य उलगडण्यात अखेर दहशतवाद विरोधी पथकास(एटीएस) यश आले. गेल्या सात महिन्यात या स्फोटाचे धागेदोरे सापडू शकले नव्हते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी स्फोटाचे धागेदोरे या पथकाच्या हाती लागले एवढेच नाही तर ते उलगडूनही दाखवता आले या बद्द्ल एटीएसचे प्रमुख राकेश मारिया कौतुकास पात्र असले तरी हे यश निर्विवाद मानता येणार नाही, कारण ‘सूत्रधार’ सापडल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष बॉम्ब ठेवणारा आणि स्फोट घडवून आणणारा हे दोघेही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या स्फोटाच्या प्रकरणात हिमायत उर्फ युसूफ बेग(उदगीर) आणि लालबाबा मोहम्मद हुसेन फरीद उर्फ बिलाल(नाशिक) या दोघा तरुणांना अटक करण्यात आली. यातला हिमायत हा पूर्वीपासून पोलिसांना हवा होता. त्याला याआधीही दोनदा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी अटक केलेली आहे. तो लष्कर-ए- तोयबा या अतिरेकी संघटनेचा सक्रीय कार्यकर्ता आहे, याचीही एटीएसच्या दप्तरी नोंद आहे. तरीही त्याला अटक करण्यासाठी सात महिने का लागावेत हे समजण्यापलिकडचे आहे. त्याने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे असलेल्या आपल्या सायबर कॅफेमध्ये या बॉम्बस्फोटाचा कट रचला आणि त्याची अमलबजावणी केली असल्याचे मारिया यांनी सांगितले. मारिया यांनी काही दिवसांपूर्वीच एटीएसच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. या आधी के.पी. रघुवंशी हे एटीएसचे प्रमुख होते. त्यांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली होती. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गेल्या 25 आठवड्यात 25 वेळा ‘जर्मन बेकरी’च्या स्फोटाचा तपास पूर्ण झाल्याचे सांगून अधिकृत घोषणेची ‘तारीख पे तारीख’च दिली होती. या प्रकरणातील आरोपी ‘आयडेन्टिफाय’ केले असल्याचे त्यांनी चार जुलै रोजी जाहीर केले होते. तसेच या प्रकरणातील आरोपींची नावे दहा तारखेपूर्वी जाहीर करू असे त्यांनी चार सप्टेंबर रोजी एका पत्रकार परिषदेतजाहीर केले होते. त्यानुसार आठ सप्टेंबर रोजी ते जाहीर करण्यात आले. हे एवढे सगळे एवढे ‘कॅलक्युलेटेड’ असल्यानेच मारिया यांनी उघड केलेले जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचे रहस्य ‘बेक’ केलेले तर नाही ना अशी शंका वाटते. ऐन गणेशोत्सवाच्या काळात अतिरेक्यांनी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी एटीएस पथकाची दहशत वाटावी, यासाठी हा सारा आटापीटा असेल,तर पुढील दहा दिवसांत सामान्य माणसाला जागरूकच राहावे लागेल.Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा