पहिले पान | मनोरंजन | `यू ट्युब'वर दिसंतय सुंदर माझं `कोकण'!

`यू ट्युब'वर दिसंतय सुंदर माझं `कोकण'!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी यू ट्युबसारख्या माध्यमाचा उपयोग आता मराठी चित्रपटांचे निर्मातेही करू लागले आहेत.

मुंबई- चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी पाण्यासारखा पैसा ओतणे आता नवीन राहिलेले नाही. वाहिन्यांवर जाहिरातींचे स्लॉट खरेदी करण्यापासून ते होर्डिग्ज-बॅनर्सपर्यंत अनेक माध्यमे चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी वापरली जातात. मराठीत क्वचितप्रसंगी वेबसाइटही तयार केली जाते. पण, मी शिवाजीराजे भोसले बोलतोयचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर आणि सुंदर माझं घरचे दिग्दर्शक दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी यू टय़ूबचा आधार घेतला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच अशा आगळ्या आणि कल्पक प्रसिद्धीतंत्राचा वापर होत असून सुंदर माझं घरमध्ये टिपलेलं निसर्गरम्य कोकण यानिमित्ताने थेट यू टय़ूबवर पोहोचले आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनीच संगीतबद्ध केलेली गाणी आणि चित्रपटाचे प्रोमो  यू टय़ूबवर उपलब्ध आहेत. शिवाजीराजे..ला यू टय़ूबवर तीन दिवसांत पाच हजार हिट्स मिळाले आहेत. सुंदर माझं घरबाबत प्रहारशी बोलताना प्रभुलकर म्हणाले की, जगभरात इंटरनेट वापरणा-यांची संख्या वाढत चालली आहे. यू टय़ूबआणि वेबसाईटसारख्या माध्यमातून फुकटात लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते. परंतु, बहुतांश मराठी निर्माते या तंत्रज्ञानाच्या क्रांतीबद्दल अजूनही अनभिज्ञ आहेत. सुदैवाने माझ्या सहवासातील लोकांमुळे इंटरनेटचे महत्व, ताकद आणि उपयुक्तता याची मला जाणीव आहे. त्यातूनच सुंदर माझं घरची गाणी आणि प्रोमो आम्ही यू टय़ूबवर उपलब्ध केली आहेत.

 चित्रपटाची कथा व कलाकारांची माहिती, छायाचित्रे, गीते www.sundarmazeghar.com या वेबसाईटवरही पाहायला मिळतात. मराठी व इंग्रजीत असणारी ही वेबसाईट बनवण्यासाठी केवळ तीस हजार रुपये खर्च आला. कोकणातील एकत्र कुटुंबात वाढलेल्या पालवी नावाच्या मुलीची, नवरा आणि त्याचे कुटुंबीय यांच्यातील दुरावा संपवून त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी चाललेली धडपड, हे चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र आहे. मधुराणी गोखले, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते आदींनी त्यात भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट  १७ एप्रिलला महाराष्ट्राच्या काही भागांत, तर   ५ मेला मुंबईत प्रदर्शित होणार आहे. 

Marathi Online News

प्रतिक्रियां (5 पोस्टेड ):

sonawane deepak on 25 July, 2009 09:28:39 AM
avatar
konkan kharokharach sunder aahe

konkanacha vikas jhalach pahije.
on 18 August, 2009 11:49:59 AM
avatar
प्रहार amol bonanza
Virparth B Rane on 11 November, 2009 01:59:57 PM
avatar
aamcha कोंकण ,कोंकण kiti chaan
maharashtracha dhan, जणू kashmir nandavana.............
mohan bhalsing on 12 November, 2009 02:31:58 PM
avatar
प्रहार सुन्दर आहे. मोहन भाल्सिंग
sachin chavan on 07 February, 2010 11:05:17 AM
avatar
प्रहार हे मराठी दैनिक उत्कृष्ट वर्त्तमान पेपर असून ,ज्नज्ग्रुतिसथी अत्यंत उपयुक्त असे लोक्दैनिक आहे .

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आता आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
3.73