पहिले पान | मनोरंजन | भारतीय संगीताकडे जगाचा ओढा

भारतीय संगीताकडे जगाचा ओढा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारतीय शास्त्रीय संगीत केवळ आपल्या देशापुरते सीमित राहिले नाही तर या संगीताकडे जगाचा ओढा आहे. कारण हे संगीत ईश्वराशी नाते जोडणारे आहे, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

लातूर- भारतीय शास्त्रीय संगीत केवळ आपल्या देशापुरते सीमित राहिले नाही तर या संगीताकडे जगाचा ओढा आहे. कारण हे संगीत ईश्वराशी नाते जोडणारे आहे, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

 लातूर येथील पू. स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमाला व पुण्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सवाई संगीत संमेलन २०१०च्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते.

भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी परदेशातून लोक येत आहेत. हे संगीत कितीही ऐकले तरी त्यातील गोडी कमी होत नसल्याचे सांगतानाच हे संगीत ईश्वराकडे नेणारे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु आपल्याला सर्व काही झटपट हवे असते. मात्र हे संगीत सिनेमातील गाण्यासारखे नसल्याचा उल्लेख त्यांनी केला.

 

स्वामी रामानंदतीर्थ यांचे मराठवाडय़ाशी अत्यंत जवळचे नाते आहे, असे सांगून त्यांच्यामुळे हैदराबाद राज्यातून मराठवाडा मुक्त होऊन महाराष्ट्रात सहभागी झाला. त्यासाठी स्वामीजींनी दिलेले योगदान खूप मोठे असून मराठवाडा ते कदापि विसरू शकत नसल्याचे ते म्हणाले.

 सवाई संगीत संमेलनाच्या आयोजनातून नुसते गाणे ऐकणे हा उद्देश नाही, तर चांगले ऐकणारे श्रोते तयार व्हावेत, हा यामागचा उद्देश असल्याचे स्वागताध्यक्ष आमदार दिलीप देशमुख म्हणाले. या वेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यवाह पं. श्रीकांत देशपांडे, पं. श्रीनिवास जोशी, पं. अजय पोहनकर, आमदार वैजनाथ शिंदे, व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी आदी उपस्थित होते. 

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0