पहिले पान | मनोरंजन | 60 वर्षापूर्वीच्या दुर्मीळ चित्रफितींचा खजिना खुला

60 वर्षापूर्वीच्या दुर्मीळ चित्रफितींचा खजिना खुला

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ब्रिटिशांच्या भारतावरील राजवटीच्या शेवटच्या काळात भारत तसेच इतर दक्षिण आशियाई देशांतील समाजाचे चित्रण करणा-या 300 दुर्मीळ चलचित्रांचा खजिना इंटरनेटवर नि:शुल्क उपलब्ध करण्यात आला आहे.

लंडन- ब्रिटिशांच्या भारतावरील राजवटीच्या शेवटच्या काळात भारत तसेच इतर दक्षिण आशियाई देशांतील समाजाचे चित्रण करणा-या 300 दुर्मीळ चलचित्रांचा खजिना इंटरनेटवर नि:शुल्क उपलब्ध करण्यात आला आहे.

 

केंब्रिज विद्यापीठाच्या दक्षिण आशिया अभ्यास विभागाकडे हे चलचित्रपट जतन करण्यात आले होते व गुरुवारपासून ते या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले. हे चलचित्रपट कोणीही डाऊनलोड करू शकतो. 50 वेगवेगळ्या खासगी संग्राहकांच्या संग्रहातून हा खजिना साकारला आहे. भारत तसेच दक्षिण आशियात 1911 ते 1956 या काळात भारतात वास्तव्य केलेल्या तसेच येथे कार्यरत असलेल्या मंडळींनी या चलचित्रफिती तयार केल्या आहेत. आज आपण ज्या पद्धतीने घरगुती सोहळे चित्रीत करतो, त्या धर्तीवर या चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत.

 

विविध विषयांवरील हे माहितीपट असून त्यात 1947ला भारताची फाळणी झाल्यानंतर झालेला हिंसाचार ते रेल्वे उभारणीच्या, धरणांच्या कामावर कार्यरत कामगार असे विविध विषय हाताळण्यात आले आहेत. मुंबई आणि बंगाल प्रांताचे गव्हर्नर म्हणून काम केलेल्या लॉर्ड ब्रेबर्न यांच्या दफनविधीचाही एक माहितीपट या संग्रहात आहे. 

 या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे तत्कालीन समाज, लोक आपापसात कसा संवाद साधत, ब्रिटिशांची त्यांच्या नोकरांशी वागण्याची पद्धत कशी होती, यासारख्या कागदोपत्री दस्तऐवजांत न आलेल्या बाबी थेट आपल्याला पाहता येणार आहेत. ब्रिटिशकाळात ब्रिटिशांची तसेच भारतीयांची जीवनपद्धती कशी होती, याचे चित्रण प्रामुख्याने या चलचित्रपटांमध्ये आहे. त्या काळातील महिलांचे समाजातील स्थान काय होते, याचेही प्रभावी चित्रण असलेला एक माहितीपट या संग्रहात आहे. त्याशिवाय सरकारी सोहळ्यांना अधिकाऱ्यांची कशा प्रकारे उपस्थिती असे, घोडय़ांच्या शर्यतीत त्या काळातील अधिकारीवर्ग कसा आपला दिवस घालवत असत, या विषयांसह राजघराण्यांमधील जंगी विवाहसोहळे, आदिवासींचे नृत्य, शेतात काम करणारे शेतकरी, शाळेत जाणारी मुले असे नानाविध विषय या चित्रपटांमध्ये आहेत.

या चित्रपटांमुळे सुमारे 60 वर्षापूर्वीचा काळ पुन्हा जिवंत होईल. फाळणीसारखी घटना व तिचे परिणाम तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहता येतील, असे आशियाई अभ्यास केंद्राचे सदस्य डॉ. केव्हिन ग्रीनबँक यांनी सांगितले. या चित्रपटांचा संग्रह सुरुवातीला या केंद्राच्या पहिल्या कार्यकर्त्यां मेरी थॅचर यांनी केला.

http://lucknow.asian.cam.ac.uk/archive/films/filmlist.html  या लिंकवरून सर्व फिल्म तुमच्या संगणकावर पाहता येतील.   

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0