रवींद्र महाजनी यांना ‘कलागौरव’ पुरस्कार
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना यंदाचा संस्कृती कलादर्पण कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना यंदाचा संस्कृती कलादर्पण कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट आणि नाटय़क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. येत्या 11 मार्चला मुंबईत माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात होणा-या गौरव रजनीत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. त्यांच्यासह वसंतराव पाटील (आदर्श शिक्षक), चित्रपट प्रसिद्धी समन्वयक राम कोंडीलकर आणि पत्रकार संतोष भिंगार्डे (कलासेवा) यांचाही या वेळी गौरव होणार आहे.
या सोहळ्यात उत्कृष्ट नाटक, चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री तसेच तांत्रिक पुरस्कारांचेही वितरण होईल. या पुरस्कारांसाठी नामांकनेही घोषित झाली आहेत. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, व्हाईट-लिली आणि नाइट-रायडर या नाटकांना तर पांगीरा, नटरंग या चित्रपटांना सर्वात जास्त नामांकने जाहीर झाली आहेत.
यंदा चित्रपट विभागात एकूण 28 चित्रपटांचा तर नाटय़विभागात 26 व्यावसायिक नाटकांचा समावेश होता. बहुरुपी, व्हाइट लिली.., निखारे, झालं गेलं विसरून जाऊ, गोविंद घ्या.. या पाच नाटकांतून सवरेत्कृष्ट नाटकाची निवड होईल. गांधी विरुद्ध सावरकर, झिम पोरी झिम आणि चॉईस इज युवर्स या नाटकातून लक्षवेधी नाटक निवडण्यात येईल. अरुण नलावडे (निखारे), प्रशांत दामले (बहुरुपी), उमेश कामत (मन उधाण वा-याचे), दीपक करंजीकर (गांधी विरुद्ध सावरकर), भरत जाधव (टाइमपास) या अभिनेत्यांमध्ये, तर स्मिता तळवलकर, निर्मिती सावंत, श्वेता शिंदे, रसिका जोशी, सुप्रिया पिळगावकर या अभिनेत्रींमध्ये पुरस्कारासाठी चुरस आहे.
त्याखेरिज सवरेत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, विनोदी अभिनेता-अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, पार्श्वसंगीत, वेशभूषा आदी विभागातही पारितोषिकांसाठी नामांकने जाहीर झाली आहेत.


del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा