पहिले पान | मनोरंजन | सर्वोत्कृष्ट आशियाई कलाकारांत पाच भारतीय

सर्वोत्कृष्ट आशियाई कलाकारांत पाच भारतीय

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापूर्वी ‘सीएनएन’ने जाहीर केलेल्या आशिया खंडातील 25 सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत गुरुदत्त, मीना कुमारी, नर्गिस, प्राण आणि अमिताभ बच्चन या पाच भारतीय कलाकारांची नावे आहेत.

न्यूयॉर्क- जुने हिंदी चित्रपट आणि त्यातील कलाकारांची अभिनयशैली आजही भारतीयांबरोबरच जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापूर्वी सीएनएनने जाहीर केलेल्या आशिया खंडातील 25 सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत समाविष्ट असलेली गुरुदत्त, मीना कुमारी, नर्गिस, प्राण आणि अमिताभ बच्चन या पाच भारतीय कलाकारांची नावे त्याचीच साक्ष देतात. 

 

भारत, चीन, जपान, कम्बोडिया, सिंगापूर, थायलंड, मलेशिया आणि कोरिया या देशांतील कलाकारांच्या यादीत भारतीय कलाकारांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत केवळ दोनच आशियाई कलाकारांनी ऑस्कर पुरस्कारांवर आपले नाव कोरले असले तरी अनेक आशियाई अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपल्या कामाचा ठसा उमटवत त्या त्या देशाचा चित्रपटांचा इतिहास बदलून टाकला आहे, असे सीएनएनने म्हटले आहे. सीएनएनच्या संकेतस्थळाने प्यासा, कागज के फूल या चित्रपटांतील अभिनयाबरोबरच विविध चित्रपटांच्या दिग्दर्शनाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटावणा-या गुरुदत्त यांची तुलना ऑर्सन वेल्स यांच्याशी केली आहे. प्यासा या चित्रपटातील संवेदनशील कवीच्या भूमिकेसाठी त्यांचे नाव या यादीत आहे.

 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडियातील अभिनयाद्वारे नर्गिस यांनी या यादीत स्थान मिळवले आहे. या चित्रपटासाठी ऑस्करचे नामांकन मिळालेल्या नर्गिस यांनी त्या वेळीही अनेकांची वाहवा मिळवली होती. हा चित्रपट म्हणजे गॉन विथ द विंडची भारतीय आवृत्ती म्हणून गौरवण्यात आले होते.

जंजीर चित्रपटात साकारलेल्या पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेबद्दल अमिताभ बच्चन यांचा या यादीत समावेश झाला आहे. भारतीय चित्रपटांतील सौम्य, शांत असणारा नायक बदलण्याचे श्रेय अमिताभ बच्चन यांना जाते, असे गौरवोद्गार सीएनएनने काढले आहे. 300हून अधिक चित्रपटांत दिलेल्या योगदानाबद्दल दिग्गज अभिनेते प्राण यांचा या यादीत समावेश झाला आहे. प्राण यांनी भारतीय सिनेमात व्हिलनची एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केली, असे सीएनएनने म्हटले आहे. 

 साहिब बिबी और गुलाम या चित्रपटातील अप्रतिम अभिनयामुळे मीनाकुमारी यांनी या यादीत स्थान पटकावले आहे. ट्रॅजेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारी यांच्या  या चित्रपटात वास्तव जीवनाशी जुळणारी अशी भूमिका त्यांनी साकारली होती. या सर्व कलाकारांनी वेगवेगळ्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळा इतिहास निर्माण केला, असे सीएनएनने म्हटले आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद अली आणि झेबा बख्तियार तसेच झोऊ हून, गोग ली आणि रॉन लिंगयू या चिनी कलाकारांनीही या यादीत स्थान पटकावले आहे.  

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0