दिग्दर्शनाचा ऑस्कर पुरस्कार प्रथमच महिलेला
महिला दिन उत्साहात साजरा होत असतानाच ऑस्कर पुरस्कारांच्या इतिहासात प्रथमच महिलेने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवला आहे.
लॉस एन्जेलिस- ऑस्कर पुरस्कारांच्या 82 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार महिलेला मिळाला आहे. कॅथरिन बिगोलो यांना 'द हर्ट लॉकर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे, तर याच चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही पटकावला आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
बहुचर्चित `अवतार' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक, छायाचित्रण आणि व्हिज्युअल इफेक्टसाठी पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जेफ ब्रिजेस यांना(चित्रपट-क्रेझी हर्ट) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सँड्रा बुल्फ (द ब्लाईंड स्लाईड) यांना मिळाला. किरस्टोक वॉटझ यांना सहाय्यक अभिनेत्याचा तर मोनिक यांना सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
परदेशी चित्रपटांच्या विभागात अर्जेंटिनाच्या सिक्रेट या चित्रपटाला उत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा