मनोरंजन
पर्यावरणाचं चर्चिक नाटक
‘जो लोक जिम्मेदारी के बिना अधिकारों का प्रयोग करते हैं, वे अक्सर अपने अधिकारों की खो बैठते हैं।’ असं एक हिंदी वचन आहे. त्याचा प्रत्यय पुरुषोत्तम बेर्डे लिखित, दिग्दर्शित ‘गांधी विरुद्ध सावरकर’ या नाटकात येतो. भारतीय राजकीय इतिहासातील म. गांधी आणि स्वा. सावरकर या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या नामसाधम्र्याखेरीज या नाटकात त्यांच्याविषयी काहीही नाही. त्यामुळे त्यांच्या ‘वादा’लाही इथं स्थान नाही.
अपेक्षाभंगाचं सुख
एखाद्या चित्रपटाविषयी शून्य अपेक्षा असताना तो चक्क चांगला निघाल्यावर होणारा आनंद अवर्णनीय असतो. नेमका हाच आनंद ‘राइट या राँग’ देतो. वर्षभरापासून डब्यात असलेला हा चित्रपट फारसा गाजावाजा न होता प्रदर्शित झाला. ...दिग्दर्शनाचा ऑस्कर पुरस्कार प्रथमच महिलेला
महिला दिन उत्साहात साजरा होत असतानाच ऑस्कर पुरस्कारांच्या इतिहासात प्रथमच महिलेने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवला आहे. ...सत्तेपुढे सत्याचा पराभव
सामाजिक चळवळीचा उद्देश समाजासाठी कितीही लाभदायक असला तरी त्याचं भवितव्य, यशस्विता ही राजकीय स्वार्थाच्या निकषावर ठरते. राजकीय नेतृत्वाखाली ही चळवळ सोयीची वाटत असेल, तर त्यास राजाश्रय मिळतो. अन्यथा, ती सारी चळवळच, अगदी नैसर्गिक वाटावी अशी, नेस्तनाबूत केली जाते. प्रेमानंद गज्वी यांनी आपल्या ‘डॅम इट अन् गोरे’ या नव्या नाटकात अशाच एका चळवळीचं ‘स्वरूप’ मांडतानाच सामान्य माणसांच्या आयुष्यात, त्यात अपरिहार्यपणे होणारं मातेरं अधोरेखित केलं आहे....अतिथी देवो भव:!
विनोदाला असलेली कारुण्याची झालर, हसता हसता नकळतपणे डोळ्यांतून पाणी आणण्याची असलेली क्षमता ही उत्तम, दर्जेदार विनोदाची कसोटी मानली जाते. ‘अतिथी तुम कब जाओगे?’ आश्चर्यकारकरीत्या या कसोटीला खरा उतरतो. ...भन्नाट कॅलिडोस्कोप
रस्त्यावरच्या प्रवासात घडणा-या चित्रपटांचं, रोड मूव्हीजचं एक स्वतंत्र दालन हॉलिवुडमध्ये आहेत. आपल्याकडे मात्र आता कुठे या प्रकारचे सिनेमे बनायला सुरुवात झाली आहे. राजस्थानच्या रखरखीत, वैराण वाळवंटातून दिग्दर्शक देव बेनेगल प्रेक्षकाला मस्तपैकी भटकून आणतो आणि तिथल्या अस्सल हाडामांसाच्या माणसांची ओळख करून देतो. ...सर्वोत्कृष्ट आशियाई कलाकारांत पाच भारतीय
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापूर्वी ‘सीएनएन’ने जाहीर केलेल्या आशिया खंडातील 25 सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत गुरुदत्त, मीना कुमारी, नर्गिस, प्राण आणि अमिताभ बच्चन या पाच भारतीय कलाकारांची नावे आहेत....रवींद्र महाजनी यांना ‘कलागौरव’ पुरस्कार
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना यंदाचा संस्कृती कलादर्पण कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ...60 वर्षापूर्वीच्या दुर्मीळ चित्रफितींचा खजिना खुला
ब्रिटिशांच्या भारतावरील राजवटीच्या शेवटच्या काळात भारत तसेच इतर दक्षिण आशियाई देशांतील समाजाचे चित्रण करणा-या 300 दुर्मीळ चलचित्रांचा खजिना इंटरनेटवर नि:शुल्क उपलब्ध करण्यात आला आहे. ...भारतीय संगीताकडे जगाचा ओढा
भारतीय शास्त्रीय संगीत केवळ आपल्या देशापुरते सीमित राहिले नाही तर या संगीताकडे जगाचा ओढा आहे. कारण हे संगीत ईश्वराशी नाते जोडणारे आहे, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. ...मोस्ट कमेंटेड



‘मास्को’ द ड्रामा