नाट्यपट
सत्तेपुढे सत्याचा पराभव
सामाजिक चळवळीचा उद्देश समाजासाठी कितीही लाभदायक असला तरी त्याचं भवितव्य, यशस्विता ही राजकीय स्वार्थाच्या निकषावर ठरते. राजकीय नेतृत्वाखाली ही चळवळ सोयीची वाटत असेल, तर त्यास राजाश्रय मिळतो. अन्यथा, ती सारी चळवळच, अगदी नैसर्गिक वाटावी अशी, नेस्तनाबूत केली जाते. प्रेमानंद गज्वी यांनी आपल्या ‘डॅम इट अन् गोरे’ या नव्या नाटकात अशाच एका चळवळीचं ‘स्वरूप’ मांडतानाच सामान्य माणसांच्या आयुष्यात, त्यात अपरिहार्यपणे होणारं मातेरं अधोरेखित केलं आहे.
अतार्किक लेखन
स्त्रीवर बलात्कार होतो, त्यात तिचा काय दोष असतो? अत्याचारित असूनही, समाज मात्र तिला दूषणं देतो. लोक काय म्हणतील, या भीतीपोटी पती, बलात्कारित स्त्रीला दूर राखतो. त्यांच्यात शारीरिक अन् मानसिक पातळीवरही अंतराय निर्माण होतो. हा विषय घेऊन गुरू प्रॉडक्शन’निर्मित ‘चाफा बोले हा..’ हे नवीन नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलंय....संगीताने धुंद मदनरंग
संगीत नाटकांमधून प्राधान्य संगीतास असणार हे तर अध्याहृतच आहे. पण नाटकास एक कथानक, नाटय़ असायला हवं. ही किमान अपेक्षा असते. संगीत नाटकांमधून कथानक, संगीताच्या प्रभावानं, दुय्यमस्थानी जाते. संगीत ‘अवघा रंग..’ याला अपवाद, तसं ‘सं. मदनरंग’ ही. ‘मदनरंग’मधून मात्र पारंपारिक नाटकांप्रमाणे एक संदेश, नाट्यकथानकातून, आपसूकच दिला जातो. ...मृत्यूवरचं ‘गोड’ भाष्य
महर्षी व्यासांच्या ‘महाभारता’तील पात्रांना विविध प्रकारे मृत्यू आलेत. त्यातील पात्रांच्या जन्मकथा आणि मृत्यू याविषयीही वेगळा ग्रंथ होऊ शकेल, इतकं आव्हानात्मक साहित्य ‘महाभारता’त आहे. मात्र मृत्यू, मरणाविषयी गांभीर्यानं चर्चा होत नाही, तो साहित्याचा केंद्रभूत विषयही ठरत नाही. असं असताना रत्नाकर मतकरींसारख्या लेखक/नाटककारानं ‘मृत्यू’विषयी चिंतन करावं, हे अजबच म्हणायला हवं आणि ‘अष्टविनायक’च्या दिलीप जाधव यांनी ते व्यावसायिक रंगमंचावर आणलं, हे धाडसच म्हणायला हवं....कलावंताची ‘बहुरूपी’ मनस्विता!
कलेला नसते जात, नसतो धर्म, संगीत हाच धर्म, तीच जात त्यात भेदभाव नाही. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत यांची आराधना, सेवा करणारे देवीच्या पायाशी सारे समतल! पण याचबरोबर निरपेक्ष संगीत साधना करणारे आणि कलेला व्यावसायिक, बाजारू, तात्कालिक रूप देणारे उथळ लोक यांच्यातील संघर्षही यात येतो तो राज आणि सदा या पात्रांमधून. ...फिल्मी वेडापायी वाताहात
आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत गाजलेली‘हाऊसफुल्ल’ही एकांकिका मोहन वाघांना भावली. त्यात त्यांना नाटकाचं बीज, शक्यता जाणवल्या. हृषिकेश कोळी यांच्याकडून त्यांनी ‘हाऊसफुल्ल’चं‘एक तिकीट सिनेमाचं’ हे नाटक लिहून घेतलं....आयुष्यातील रितेपणाला आव्हान
शफाअत खान यांनी आपल्याच ‘क’ या एकांकिकेचा दीर्घाक आणि नंतर त्याचं पूर्ण नाटकात रूपांतर केलंय..‘टाइमपास’ या नावानं सुधीर भट-गोपाळ अलगेरी या नाट्यनिर्मात्या जोडीच्या ‘सुयोग’ या नाट्यसंस्थेद्वारा ते व्यावसायिक रंगमंचावर आलंय....केंद्रित विषयातून विनोदनिर्मिती
वास्तव अथवा तर्काला बाजूला सारून निव्वळ मजा म्हणून ‘विनोदी’ पद्धतीनं एखाद नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर होतं, तेव्हा ते मनमौज नाटक होतं. अशा विनोदी नाटकांना त्या-त्या नाट्यकथानकापुरताच, त्याचा स्वत:चा तर्क असतो; तिथं इतर निकष लावता येत नाहीत. हे कसं, का, याचं अशी का वागतात.. वगैरे प्रश्न-शंका इथं फिजुल असतात. ‘हॉटेल हनिमून’ नावाचं नाटक याच पठडीतलं. ...थोडं फार्सिकल, थोडं विनोदी
लेखक-दिग्दर्शक सतीश तारे यांचं नवं नाटक ‘आपलं ठेवा झाकून’ थोडं विनोदी, थोडं फार्सिकल, मध्येच गंभीर अशा आगळ्यावेगळ्या शैलीत सादरीकरण झालेलं आहे. ...न विसरण्याजोगं विचारनाट्य
‘झालं गेलं विसरून जाऊ’ हे त्यांचं ‘राजन क्रिएशन्स’ने व्यावसायिक रंगमंचावर आणलेलं नाटक. ‘डावेदार’ या नावाने त्याचं लेखन झालं होतं. ‘झालं गेलं..’ हे त्याचं व्यावसायिक नामकरण. खरं तर ‘डावेदार’ या नावातून नाटकाचा, लेखकाला अपेक्षित असणारा विषय सूचित होतो, तसा तो व्यावसायिक नामकरणातून होत नाही....मोस्ट कमेंटेड


‘मास्को’ द ड्रामा