PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मजेत मस्त तंदुरुस्त आहारच महत्त्वाचा ================================================================================ बिना लोके on 22 May, 2012 02:50:00 AM कावीळ या आजाराप्रमाणेच मूतखड्याच्या त्रासाविषयी आजही अनेक गैरसमजुती आहेत. बऱ्याचदा तज्ज्ञ डॉक्टरांकडे न जाता बुवा-बाबांकडे जाऊन, मंत्र-तंत्र जपणाऱ्यांकडे जाऊन मूतखडा काढण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र प्रत्यक्षात मूतखडा का होतो, त्याची कारणं वेगळी आहेत. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने क्षारांचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या क्षारांचे कण तयार होतात. हे कण वाढले की त्यापासून मूतखडे बनतात. मूतखड्यांवर उपचार पद्धतीही अनेक आहेत. एकदा झालेला मूतखडा काढला की होऊ नये म्हणून योग्य आहारप्रणालीचा अवलंब केला पाहिजे. त्याची माहिती देणारा हा लेख. उन्हाळी विकार ================================================================================ वैद्य नितीन कामत on 22 May, 2012 03:15:00 AM ‘महिमा काळाचा’ या सदराच्या गेल्या भागात उन्हाळ्यातल्या सौम्य आजारांविषयीची माहिती वाचली. आज आपण उन्हाळय़ातल्या तीव्र विकारांची माहिती घेऊ या. उन्हाळ्यातील खबरदारी ================================================================================ वैद्य नितीन कामत on 15 May, 2012 05:00:00 AM उन्हाळा म्हटलं की, पित्ताचे आजार, घामाचा त्रास, उष्णतेचे विकार डोकं वर काढतात. वेळीच योग्य ती काळजी घेतली तर उष्णतेमुळे होणारे आजार गंभीर रूप धारण करत नाही. हवमानाप्रमाणे, सभोवतालच्या वातावरणानुसार आपल्या आहारात, रोजच्या राहणीमानात बदल करणारी व्यक्ती नेहमीच निरोगी राहते. योग आणि सौंदर्य ================================================================================ डॉ. कल्पना खांडेकर on 15 May, 2012 04:50:00 AM चांगल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी जीवनातील सर्व गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे, हे आपण ‘योगगंध’च्या मागच्या भागात पाहिलं आहे. तेव्हा योगासनांचं महत्त्वही जाणून घेतलं. हल्ली योगसनांचा उपयोग सौंदर्य उपचार म्हणूनही केला जातोय. त्याविषयीची माहिती आजच्या भागात वाचूया. दुधाची अ‍ॅलर्जी ================================================================================ डॉ. सागर खेदू on 15 May, 2012 04:40:00 AM मोठ्यांप्रमाणे लहान बाळांनाही अ‍ॅलर्जी होते. लहान बाळांना आईच्या दुधातून अ‍ॅलर्जी होते. उन्हाळ्यात वातावरणातल्या बदलामुळे अ‍ॅलर्जी तीव्र स्वरूप धारण करते. अशा वेळी आईने योग्य काळजी घेतलेली कधीही चांगली. वैशाख वणव्यातला आहार.. ================================================================================ नैद्य नितीन कामत on 08 May, 2012 07:55:00 AM वैशाख वणव्याने वातावरणात कमालीचा बदल होतो. सृष्टी तावून निघते. प्राणिमात्र कडक उन्हाने त्रस्त होतात. म्हणूनच या ऋतूप्रमाणे आपला आहार असला पाहिजे, असं आयुर्वेद सांगतं. औषधी डाळिंब ================================================================================ डॉ. सुधीर जुवेकर on 08 May, 2012 07:50:00 AM निसर्गाने निर्माण केलेल्या फळांमध्ये डाळिंब हे एक सुंदर आणि श्रेष्ठ फळ आहे. डाळिंबाच्या आत लाल लाल माणकांसारखे सुंदर दाणे असतात. या दाण्यांचेही तीन प्रकार आहेत. गोड, आंबटगोड आणि आंबट. डाळिंबाचे दोन प्रकार असतात. लाल आणि सफेद रंगाचं. योग एक जीवनप्रणाली ================================================================================ डॉ. कल्पना खांडेकर on 01 May, 2012 08:25:00 AM आनंदी आत्मविश्वासू, ब्रह्मचारी पराक्रमी। अखंड ज्ञान जिज्ञासू मिताहारी शतायुषी।। या उक्तीशी समरस होऊन आनंददायी जीवन जगता येतं. त्यासाठी आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात योगसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात योगसाधना म्हणजे काय, योगासनांचा प्रत्येकाच्या आयुष्यात कसा उपयोग होतो, याचा आढावा देणारं हे नवं पाक्षिक सदर..योगगंध! विड्याची आरोग्यशुद्धी ================================================================================ डॉ. सुधीर जुवेकर on 01 May, 2012 07:15:00 AM पान खाण्याने तोंडाची अरुची कमी होते. तोंडाचा चिकटपणा, बेचवपणा आणि दरुगधी नाहीशी होते. पाचकरस योग्य प्रमाणात स्र्वतात. अन्नपचन होतं. एकंदरीत नागवेलीचं पान खाल्ल्याने आरोग्यशुद्धी होते. औषधांचं आगर.. ================================================================================ नितीन कामत on 01 May, 2012 07:05:00 AM वातावरणात कित्येक बदल होतायंत. कधी उकाडा, तर कधी थंडी.. मधूनच पावसाची चिन्हंही दिसतात. हे असमतोल वातावरण विविध आजारांना आमंत्रण देतं. आजार होऊ नये, आणि झालेल्या आजाराने गंभीर स्वरूप धारण करू नये, यासाठी काळजी घेतलीच पाहिजे. योग्य आहार आणि दुसरं म्हणजे घरगुती उपचार. या सा-याची माहिती देणारी ही लेखमाला..