मजेत मस्त तंदुरुस्त
घरच्या घरी वजन कमी
04 October, 2011 06:00:00 AM
कोणतीही व्याधी नसताना जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर काही घरगुती उपचारही करता येतात.
दुखणी म्हातारपणाची
27 September, 2011 04:30:00 AM म्हातारपण म्हणजे आयुष्याची संध्याकाळ. संध्याकाळी आकाशात रेंगाळलेल्या रंगांसारखंच हे वय असतं. रंग पसरू नयेत म्हणून जशी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे म्हातारपणीही कुठल्या व्याधी जडू नयेत किंवा जडलेल्या व्याधींनी अक्राळविक्राळ स्वरूप प्राप्त करू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. हाडं ठिसूळ होणं आणि संधिवात हे या वयात होणारे विशेष आजार. एक ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून म्हातारपणी हाडांची काय काळजी घेतली पाहिजे याबाबत अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून टाकलेला हा प्रकाशझोत.....विकाररूपी शत्रूंशी सामना
27 September, 2011 04:45:00 AM वाढत्या वयासोबत सांधेदुखी, रक्तदाब वाढणं, मधुमेह, हृदरोग, पक्षाघात, कॅन्सर यासारखे विकारही डोकं वर काढतात. वयपरत्वे अणि पूर्वायुष्यात केलेल्या स्वैर जीवनपद्धतीमुळे हे सारं घडत असतं. या वयात शरीरातले दोष-धातूंतही बरेच बदल होत जातात. वातदोष वाढतो. पित्त कमी होतं. ...मलईदार शहाळं
27 September, 2011 05:20:00 AM चाळीस-पन्नास वर्षापूर्वी शहाळे विकणा-या गाड्या फक्त रुग्णालयाजवळ उभ्या असायच्या. डॉक्टरही सांगायचे की, रुग्णाला शहाळ्याचं पाणी प्यायला द्या. त्यावेळी धडधाकट मंडळी शहाळ्याचं पाणी क्वचितच प्यायची. परंतु आता शहाळ्याचं पाणी सगळेच प्राशन करतात. ...काळजी धकधक करणा-या दिलाची
27 September, 2011 05:00:00 AM हृदयाच्या दुखण्याला. 29 सप्टेंबरला संपूर्ण जग साजरा करत असणा-या ‘वर्ल्ड हार्ट डे’चं औचित्य साधून आपल्या शरीरातल्या धकधक करणा-या दिलाच्या काळजीचे हे काही मूलमंत्र : ...दम्याची चिकित्सा
20 September, 2011 05:00:00 AM ‘श्वास’ या शब्दाशी माणसाच्या शरीरातला संबंधित अवयव म्हणजे श्वसनसंस्था. श्वसनसंस्थेत फुप्फुसांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. हवेतला प्राणवायू (ऑक्सिजन) आत घेऊन शरीरातला कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडण्याचं काम फुप्फुसं शरीरातल्या श्वसनसंस्थेमार्फत करत असतात. कोणत्याही व्यक्तीला जेव्हा दम्याची व्याधी जडते तेव्हा फुप्फुसांतल्या वायुकोषांची ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडण्याची क्रिया मंदावते. त्याने श्वसनमार्गाला सूज येते. मग सुरुवात होते दम्याला. गेल्या मंगळवारी दमा कसा होतो, त्याची कारणं आणि उपचारपद्धतींविषयीची माहिती अॅलोपथीच्या दृष्टिकोनातून घेतली. याच्या जोडीला आयुर्वेदात ‘दमा’ या व्याधीचं वर्णन नेमकं काय केलंय, हेही वाचलं. या भागात आयुर्वेदीय दृष्टिकोनातून दम्यावरच्या चिकित्सेची माहिती वाचू या. ...व्यथा बाळदम्याची
20 September, 2011 06:10:00 AM हे वाढतं शहरीकरण निरनिराळय़ा रोगांना, व्याधींना आमंत्रण देणारं ठरत आहे. या व्याधींमध्ये तसंच रोगांमध्ये ‘दमा’ या आजाराचं प्रमाण सर्वात जास्त आहे. गेल्या दोन दशकांत या आजाराचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. आकडेवारीकडे लक्ष घातल्यास 1980 साली दम्याचं प्रमाण नऊ टक्के होतं आणि आता हेच प्रमाण 30-35 टक्के इतकं आहे. ...आला सास, गेला सास
13 September, 2011 05:30:00 AM बहिणाबाईंनी केलेलं हे श्वासाचं वर्णन तंतोतंत खरं आहे. जन्मापासून मरेपर्यंत श्वसनाची प्रक्रिया सतत सुरू असते. नाकावाटे घेतलेल्या हवेचा नाक, घसा, श्वसननलिका, फुफ्फुसातील वायुकोषापर्यंत प्रवास होतो. शरीरातील अशुद्ध हवा पुन्हा उलटय़ा क्रमाने नाकावाटे बाहेर टाकली जाते. ही क्रिया इतकी सहजगत्या होत असते की कळतही नाही. मात्र धाप लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं हे प्रकार उद्भवले की, त्याचं अस्तित्व जाणवू लागतं. दम्यासारख्या आजाराची ती नांदीच असते. श्वसनाचे विविध प्रकार कोणते, पैकी कोणत्या प्रकारामुळे दम्यासारख्या आजाराला आमंत्रण मिळतं याची ही माहिती....दमवणारा दमा..
13 September, 2011 05:30:00 AM कुणाला धुराच्या त्रासाने येतो, तर कुणाला धुळीने, तर कधी दमटपणामुळेही येतो. कुणाला पाळीव प्राण्यांच्या अंगावरील धुळीने, तर कुणाला फुलझाडांवरच्या परागकणांच्या त्रासामुळे येतो. तर कुणाला बुरशीचा त्रास होऊन....अगस्तिपत्रं समर्पयामि।।
06 September, 2011 05:20:00 AM गौरी-गणपतीच्या पत्रीत अगस्ताच्या पानांचं आणि फुलांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगस्ताच्या पानांचा आणि फुलांचा वापर फक्त पुजेतच नाही, तर आहारात आणि उपचारांतही केला जातो. अगस्ताच्या शेंगा, पानांची भाजी केली जाते. फुलांपासून वडय़ा तयार केल्या जातात. याच्या पानांमध्ये मोठय़ा प्रमाणात ‘अ’ जीवनसत्त्व असतं. सर्दी झाल्यावर पानांचा रस नाकात घातला जातो. अशा या बहुपयोगी अगस्ताच्या भाजीवर टाकलेला हा प्रकाशझोत...मोस्ट कमेंटेड
















































































































राशीभविष्य