पहिले पान | विदेश | फोर्ब्सच्या युवा यादीत दहा भारतीय

फोर्ब्सच्या युवा यादीत दहा भारतीय

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

नवोदीत अतिप्रभावशाली व्यक्ती म्हणून फोर्ब्सने जाहीर केलेल्या तीस वर्षाआतील तीस प्रभावशाली व्यक्तींच्या ('30 अंडर 30') यादीत दहा भारतीयांनी स्थान पटकावले आहे.

नवी दिल्ली- नवोदीत अतिप्रभावशाली व्यक्ती म्हणून फोर्ब्सने जाहीर केलेल्या तीस वर्षाआतील तीस  प्रभावशाली व्यक्तींच्या ('30 अंडर 30') यादीत दहा भारतीयांनी स्थान पटकावले आहे.

विज्ञान, आर्थिक, कायदा, मनोरंजन, माध्यम अशा 12 विविध क्षेत्रांतील 360 युवकांमधून 30 प्रभावशाली युवकांची यादी तयार करण्यात आली आहे.

यामध्ये ऑस्टीन महाविद्यालयात शिकणा-या भारताच्या परम जग्गी या 17 वर्षीय संशोधक विद्यार्थाचा समावेश आहे. पुरस्कारविजेत्या जग्गीने गाडीमधून बाहेर पडणा-या कार्बनडाय ऑक्साइडचे ऑक्सिजनमध्ये रुपांतर करणा-या एका नलिकेचा शोध लावला आहे.

दमिश्क फॉर्च्यून या कंपनीचे मुख्य कार्याध्यक्ष विवेक नायर या दुस-या भारतीयाचा या यादीत समावेश आहे. 23 वर्षीय नायर याने तंत्रज्ञानाद्वारे औद्योगिक कार्बन वायूचे रुपांतर कार्बन नॅनोट्यूब उत्सर्जन वायूत केले आहे.

आर्थिक क्षेत्रामध्ये बँक ऑफ अमेरिकेचे आर्थिक सल्लागार असलेल्या विकास मोहिंद्रा या 25 वर्षीय भारतीयानेही या यादीत स्थान पटकावले आहे. याशिवाय सिटीग्रुपच्या युरोपीयन इक्विटी सेल्स या कंपनीचे सह अध्यक्ष मनवीर निझार (28) , गोल्डमन सॅच्क कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कुनाल शहा (29)विज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या 29 वर्षीय राज क्रिष्नन, सॉफ्टवेअरमध्ये कार्यरत असलेले  सिद्धांत गुप्ता (27) व एका कंपनीचे सहसंस्थापक निखिल अरोरा (24), व सीएनबीसीमध्ये निर्माता या पदावर काम करणारे व अर्थ विश्लेषक मनीत अहुजा (27) या भारतीयांनी या यादीत स्थान पटकावले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0