मेक्सिकोमध्ये गोळीबारात 16 ठार
मेक्सिकोमधील वेराक्रूझ प्रांतात पाच तरूणांनी गुरूवारी अंदाधुंद गोळीबार करत 11 नागरिकांना ठार केले.
मेक्सिको- मेक्सिकोमधील वेराक्रूझ प्रांतात पाच तरूण हल्लेखोरांनीनी तीन बसेसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 11 जण ठार झाले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी या पाचही जणांना ठार केल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली.
गुरुवारी पहाटे पाच बंदुकधारी हल्लेखोरांनी वेराक्रुझ प्रांतात ट्रकमध्ये भाजीपाला भरणा-या नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी इल हिगो या गावात तीन बसेसही गोळीबार केला. या हल्ल्यात 11 जण ठार झाले. हल्लेखोर आणि पोलिस पथकात झालेल्या चकमकीत या पाचही जणांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे तरुण ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित असल्याचे या अधिका-याने सांगितले.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा