PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पॅलेस्टाइनशी चर्चेस इस्त्रायल उत्सुक पॅलेस्टाइनशी चर्चेस इस्त्रायल उत्सुक ================================================================================ पीटीआय on 10 March, 2010 12:45:00 AM संयुक्त राष्ट्रे- शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पॅलेस्टाइनचे मन वळवण्याची विनंती इस्त्रयलने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांना केली आहे. पॅलेस्टाइनसोबत थेट चर्चा करण्यास इस्रयल उत्सुक असल्याचे इस्रयलचे उपपंतप्रधान शालोम यांनी बान यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. बान यांच्याशी झालेल्या चर्चेत ‘क्वारटेट’ म्हणजेच चार सदस्यीय गटांनाही पॅलेस्टाइनचे मन वळवावे, अशी विनंती इस्त्रायलने केली आहे. क्वारटेटमध्ये अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांचा समावेश आहे. ब्रिटनचे पंतप्रधान या क्वारटेटचे विशेष दूत असून त्यांची मास्को येथे 19 मार्चला बैठक होणार आहे. या बैठकीत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस पॅलेस्टाइनबरोबर थेट चर्चा करण्यासाठी क्वारटेटच्या सदस्यांचे मन वळवतील आणि या बैठकीनंतर थेट चर्चा पुन्हा सुरू होईल अशी आशा शालोम यांनी व्यक्त केली. डिसेंबर 2008 मध्ये गाझापट्टीत केलेल्या लष्करी कारवाईनंतर इस्रयल आणि पॅलेस्टाइनमधील शांतता चर्चा खंडित झाली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने पॅलेस्टाइनने चर्चा पुन्हा सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे.