PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: नायजेरियात ट्रकखाली चिरडून 75 ठार नायजेरियात ट्रकखाली चिरडून 75 ठार ================================================================================ पीटीआय on 10 March, 2010 01:25:00 PM अबुजा (नायजेरिया)- नायजेरियातील कोगी राज्यातील भर बाजारात भरधाव वेगाने येणा-या ट्रकखाली येऊन 75 जणांचा मृत्यू झाला व अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. नायजेरियातील श्रीमंत व्यावसायिक अलीको दांगोतरान यांचा मालकीचा तो ट्रक आहे.