कार्लोस स्लिम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
मेक्सिकोतील उद्योगपती कार्लोस स्लिम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असून मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस यांना त्यांनी दुस-या क्रमांकावर ढकलले आहे.
मेक्सिको सिटी- मेक्सिकोतील उद्योगपती कार्लोस स्लिम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस यांना दुस-या क्रमांकावर ढकलले आहे. फोर्ब्स नियतकालिकाने जाहीर केलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी चौथ्या स्थानावर तर स्टील टायकून लक्ष्मी मित्तल पाचव्या स्थानावर आहेत.
स्लिम यांची संपत्ती 53.5 अब्ज डॉलर आहे. गेटस यांची संपत्ती 53 अब्ज डॉलर असल्याचे या नियतकालिकाने म्हटले आहे. तिस-या क्रमांकावर वॉरन बफे आहेत. त्यांची संपत्ती 47 अब्ज डॉलर एवढी आहे.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा