PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: कार्लोस स्लिम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कार्लोस स्लिम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ================================================================================ पीटीआय on 11 March, 2010 02:00:00 PM मेक्सिको सिटी- मेक्सिकोतील उद्योगपती कार्लोस स्लिम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस यांना दुस-या क्रमांकावर ढकलले आहे. फोर्ब्स नियतकालिकाने जाहीर केलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी चौथ्या स्थानावर तर स्टील टायकून लक्ष्मी मित्तल पाचव्या स्थानावर आहेत. स्लिम यांची संपत्ती 53.5 अब्ज डॉलर आहे. गेटस यांची संपत्ती 53 अब्ज डॉलर असल्याचे या नियतकालिकाने म्हटले आहे. तिस-या क्रमांकावर वॉरन बफे आहेत. त्यांची संपत्ती 47 अब्ज डॉलर एवढी आहे.