पहिले पान | विदेश | पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, 65 ठार

पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, 65 ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पाकिस्तानच्या आदिवासी भागात शुक्रवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान 65 जण ठार, 110 जखमी झाले.

इस्लामाबाद/पेशावर- पाकिस्तानच्या आदिवासी भागातील एका गावात शुक्रवारी सरकारी कार्यालयाला लक्ष्य करून झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान 65 जण ठार झाले, तर 110 जखमी झाले. याकाघुंद गावातील या सरकारी कार्यालयाजवळच बाजार असल्यामुळे शेकडो लोकांची वर्दळ होती. 

मोटारसायकलवररून आलेल्या आत्मघाती हल्लेखोराने सरकारी कार्यालयाबाहेर स्फोटकांनी स्वतःला उडवून दिल्याचे, घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले. या हल्ल्यात 65 जण ठार झाले, 110 जखमी झाले, असे या भागातील वरिष्ठ सरकारी अधिकारी अमजद अली खान यांनी सांगितले.

जखमींवर पेशावर येथील लेडी रीडिंग रुग्णालयात उपचार चालू आहेत, असे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल हमीद आफ्रिदी यांनी सांगितले.

या कार्यालयाजवळच कारागृह आहे. हल्ल्यामध्ये या कारागृहाचे तसचे आसपासच्या अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले. अनेक इमारती कोसळल्या असून त्याखाली अनेकजण अडकले असण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांनी संबंधित भागाला वेढा घातला असून मदत आणि बचावकार्य जोरात चालू आहे.  

स्थानिक शांतता समितीचे तसेच तालिबानविरोधी संघटनेचे अधिकारी शुक्रवारी सरकारी अधिका-यांना भेटायला याकाघुंदला आले होते. त्यांना लक्ष्य करूनच हा हल्ला झाला असावा, असा कयास आहे. अर्थात आत्तापर्यंत कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

पाकिस्तानी लष्कराने गेल्या अनेक दिवसांपासून तालिबानींविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी एका सुरक्षा ठाण्यावर हल्ला करून निमलष्करी दलातील अधिका-यांचे अपहरण केले होते. गेल्याच आठवड्यात लाहोर शहरातील एका सूफी प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्यात 45 जण ठार, तर 180 जण जखमी झाले होते.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (1 पोस्टेड ):

Prasad mirlekar on 13 July, 2010 10:29:33 AM
avatar
एक दिवस हे पाकिस्तानी अतिरेकी पाकिस्तानातच न्यूक्लियर बॉम्ब टाकून स्वतःला उडवणार आहेत.

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0