PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: ‘सैन्य पाठवल्याचे वृत्त विपर्यस्त’ ‘सैन्य पाठवल्याचे वृत्त विपर्यस्त’ ================================================================================ पीटीआय on 01 September, 2010 07:35:00 PM बीजिंग : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागात चीनने 11 हजार सैनिक तैनात केल्याचे वृत्त विपर्यस्त असल्याचा दावा चीनमधील पाकिस्तानी राजदूत मसूद खान यांनी केला आहे. पाकिस्तानमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चीनने ‘मानवतावादी पथक’ पाठवले आहे, असे त्यांनी ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वर्तमानपत्राला सांगितले. गिलगिट-बाल्टिस्तान भागात चीनने 11 हजार सैनिक पाठवले असल्याचे वृत्त अमेरिकेतील ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिले होते. सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असणा-या या भागावर कब्जा करण्याच्या हेतूने चीनने तेथे रस्ते आणि रेल्वेमार्ग बांधण्याची मोहीम हाती घेतली असल्याचा गौप्यस्फोट या वर्तमानपत्राने 28 ऑगस्टला केला होता. त्याबद्दल भारताने तीव्र चिंता प्रकट करत स्वतंत्रपणे खातरजमा केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.