पहिले पान | विदेश | लाहोर बाँबहल्ल्यांतील मृतांची संख्या 39

लाहोर बाँबहल्ल्यांतील मृतांची संख्या 39

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पाकिस्तानमधील लाहोर शहरात बुधवारी शियापंथीयांच्या प्रार्थनास्थळांवर झालेल्या तिहेरी बाँबहल्ल्यांतील मृतांची संख्या आता 39वर गेली आहे.

लाहोर- पाकिस्तानमधील लाहोर शहरात बुधवारी शियापंथीयांच्या प्रार्थनास्थळांवर झालेल्या तिहेरी बाँबहल्ल्यांतील मृतांची संख्या आता 39वर गेली आहे. बाँबहल्ल्यांत झालेल्या प्राणहानीबद्दल शोक प्रकट करण्यासाठी गुरुवारी येथे शियापंथीयांनी काढलेल्या मिरवणुकीत हजारो रहिवासी सहभागी झाले होते.

 

पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांच्या मालिकेतील या ताज्या घटनेमुळे लाहोरवर शोकाचे सावट पसरले आहे. बाँबहल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी काढलेल्या मिरवणुकीत हजारो शिया मुस्लिमांनी आक्रोश केला. जाफ्रिया आघाडीचे अध्यक्ष अल्लामा अब्बास कमाली यांनी तीन दिवसांच्या दुखवट्याची घोषणा केली. पंजाब प्रांताचे कायदेमंत्री राणा सनाउल्लाह यांचे सिपाह-ए-साहेबा या शियाविरोधी प्रतिबंधित गटाशी लागेबांधे असल्याचा आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. निरपराध नागरिकांच्या हत्येबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी लाहोरमधील सर्व न्यायालये आणि मुख्य बाजार बंद ठेवण्यात आले होते. बाँबहल्ल्यांतील बळींना नासिर बाग येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 लाहोरमधील शियापंथीयांच्या एका प्रार्थनास्थळाजवळ बुधवारी संध्याकाळी दोन आत्मघाती हल्लेखोरांनी बाँबस्फोट घडवले. त्या घटनेत 28जणांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी नऊ जण रुग्णालयात मरण पावले. जबर जखमी झालेल्या दोघांचे गुरुवारी निधन झाले. बाँबहल्ल्यांत 300 रहिवासी जखमी झाले आहेत. त्यानंतर जमावातून संतप्त प्रतिक्रिया उमटली. शियापंथीयांनी एका पोलिस ठाण्याला आग लावली तसेच काही वाहने आणि दुकानेही पेटवून दिली. हिंसाचार रोखण्यासाठी पाकिस्तान रेंजर्स या निमलष्करी दलाच्या तुकड्या 15 सप्टेंबपर्यंत तैनात करण्यात आल्या आहेत. लाहोरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर कायदा आणि व्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी पहिल्यांदाच निमलष्करी दलावर सोपवण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यात समुदायांवर हल्ल्यांची मालिका सुरू असून मे महिन्यात लाहोर येथील अहमदी पंथीयांच्या दोन मशिदींत आत्मघाती हल्लेखोरांनी स्फोट घडवून 95जणांचे बळी घेतले होते. त्यानंतर जुलैमध्ये दाता दरबार दर्ग्यात दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी घडवलेल्या बाँबस्फोटांत 45जण ठार झाले होते.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0