पाकिस्तानी लष्कर हल्ल्यात 38 दहशतवादी ठार
वायव्य पाकिस्तानातील आदिवासी भागात बुधवारी पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत तालिबानच्या एका प्रमुखासह 38 दहशतवादी ठार झाले.
इस्लामाबाद- वायव्य पाकिस्तानातील आदिवासी भागात बुधवारी पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत तालिबानच्या एका प्रमुखासह 38 दहशतवादी ठार झाले.
गेल्या महिनाभरापासून तालिबान आणि लष्करामध्ये सतत चकमकी झडत असून हिंसाचाराचे अनेक बळी जात आहेत. मंगळवारी अशाप्रकारच्या चकमकीत 14 पाकिस्तानी जवान आणि 50 दहशतवादी ठार झाले होते.
बुधवारी झालेल्या चकमकीत तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुल्ला मोईनुद्दीन ठार झाला.
तालिबानच्या वाढत्या कारवाई रोखताना लष्कराच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात 20 दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानातील एका स्थानिक रेडिओने दिले. यानंतर जोगी या आदिवासी भागात सुरक्षारक्षकांसह झालेल्या चकमकीत 18 दहशतवादी ठार झाले.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा