पश्चिम आफ्रिकेत चकमकीत 47 ठार
माली सैनिक व बंडखोरामध्ये दोन दिवसांपासून चाललेल्या चकमकीत 47 जण ठार झाल्याचे पश्चिम आफ्रिकन संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.
बामाको- माली सैनिक व बंडखोरामध्ये दोन दिवसांपासून चाललेल्या चकमकीत 47 जण ठार झाल्याचे पश्चिम आफ्रिकन संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. मृतांमध्ये 45 बंडखोर व दोन सैनिकांचा समावेश आहे.
मंगळवार आणि बुधवारी झालेल्या संघार्षामध्ये मोठे नुकसान झाले असून दहा सैनिक जखमी झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बंडखोरांनी तुआरेग प्रांतातील काही शहराचा ताबा घेण्यासाठी हल्ला केल्यानंतर हा संघर्ष पेटला.
या परिसरातील आदिवासी लोक स्वांतत्र्याची मागणी करत आहेत. मात्र, संघर्ष करणारे बंडखोर हे अजावद नॅशनल लिबरेशन चळवळीतील कार्यकर्ते असल्याचे माली सरकारचे म्हणने आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा