PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मलेशियात चार भारतीयांचा होरपळून मृत्यू मलेशियात चार भारतीयांचा होरपळून मृत्यू ================================================================================ पीटीआय on 10 March, 2010 07:50:00 PM कोलालांपूर- मलेशियातील जोहार प्रांतामध्ये अज्ञात व्यक्तींनी कपड्यांच्या दुकानाला लावलेल्या आगीमध्ये चार भारतीय वंशांच्या नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी झाली. या आगीमध्ये नजीकच्या तीन दुकानांचेही नुकसान झाल्याची माहिती अग्नीशमन दलाचे वरीष्ठ अधिकारी सुकोह सैनी हशीम यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या आगीमध्ये मरण पावलेल्या नागरिकांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघाताची विस्तृत माहिती देण्यास पोलिस अधिका-यांनी नकार दिला आहे. मलेशियामध्ये भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.