या, अमेरिका आपलीच आहे!
अमेरिकेत स्थलांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एफ-1’ आणि ‘एच-1बी’ या व्हिसाच्या कडक नियमांमध्ये आता सुधारणा करून हे नियम शिथील केले जाणार आहेत.
वॉशिंग्टन- अमेरिकेत जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणा-या भारतीयांसाठी एक खुशखबर! अमेरिकेत स्थलांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एफ-1’ आणि ‘एच-1बी’ या व्हिसाच्या कडक नियमांमध्ये आता सुधारणा करून हे नियम शिथील केले जाणार आहेत. ‘आउटसोर्सिग’ बंद करून ‘इनसोर्सिग’वर भर देण्याची योजना आखणा-या अमेरिका अध्यक्ष बराक ओबामांनी कुशल मनुष्यबळाला आकर्षित करण्यासाठी ही धडपड सुरू केली आहे. या प्रकारचा व्हिसा मिळण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर भारतातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांना अमेरिकेत अधिक काळ नोकरी करता येणार आहे.विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित यांमधील पदवीधर विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी ‘एफ-1’ व्हिसाच्या धोरणात बदल या प्रकारचा व्हिसा घेणा-या विद्यार्थ्यांना वैकल्पिक प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची 17 महिन्यांची मुदतवाढ विद्यार्थ्यांच्या पत्नींना अतिरिक्त अर्धवेळ अभ्यासक्रमाची परवानगी असामान्य प्राध्यापक व संशोधकांनी त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीत साध्य केलेल्या यशाला जगासमोर आणण्यासाठी अधिक प्रमाणात वाव यासारख्या महत्त्वपूर्ण सुधारणा विशिष्ट एच-1बी व्हिसाधारकांच्या पत्नींनाही कामाची अनुमती.
त्याशिवाय गृह विभागाने 22 फेब्रुवारीपासून एक विशेष उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. सिलीकॉन व्हॅलीमध्ये एका माहिती परिषदेचे आयोजन करून ‘आंत्रप्रेन्युअर्स इन रेसिडन्स’ नावाच्या या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. बराक ओबामा यांना अपेक्षित असलेल्या 21 व्या शतकातील राष्ट्रीय सुरक्षाविषयक व आर्थिक गरजांची पूर्तता या उपाययोजनांमुळे होणार असल्याचे गृह विभागाने म्हटले आहे. आपल्या स्थलांतर प्रणालीमधील विस्कळीतपणा दूर करून तिला अधिक मजबूत आणि समावेशक बनवून या गरजा पूर्ण करण्यावर ओबामा यांचा भर असल्याचे विभागाने सांगितले आहे. या समावेशक स्थलांतर धोरणाचा एक भाग म्हणून, अमेरिकेत स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणा-या व रोजगाराच्या संधी वाढवणा-या स्थलांतरितांना आकर्षित करण्याच्या व त्यांना या देशात वाव देण्याच्या उद्देशाने कायदेशीर सुधारणांचा ओबामांनी पुरस्कार केला आहे. त्यासाठीच एच-1बी कार्यक्रमाला बळकटी देणा-या ‘स्टार्टअप व्हिसा’ची निर्मिती, परदेशी वंशाच्या विज्ञान,तंत्रज्ञान,अभियांत्रिकी व गणित क्षेत्रातील पदवीधरांच्या पदविकांना ग्रीन कार्ड स्टेपल करणे आदी बाबींचा समावेश केला आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा