पाकिस्तानमध्ये स्फोट, 20 ठार
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात शिया पंथियांच्या मिरवणुकीत रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 20 लोक ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
लाहोर- पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात शिया पंथियांच्या मिरवणुकीत रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 20 लोक ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या स्फोटात अनेक लोक जखमी झाली असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
खानपूर शहरात शिया धर्मीय लोकांची दुपारी प्रार्थना झाल्यानंतर मिरवणूक चालू असताना हा स्फोट झाला.
स्फोटानंतर आठ मृतदेह मिळाले असून सुमारे 25 लोक जखमी असल्याची बातमी पाकिस्तानातील माध्यमांनी दिली आहे.
या मिरवणूकीमध्ये 150 हून अधिक लोक सहभागी होते.
दरम्यान मिरवणूकीतील लोकांपैकी एकाचा विद्युत तारेला स्पर्श होऊन शॉर्ट सर्कीटमुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक पोलिस अधिकारी झहीर आबिद कादरी यांचे मत आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा