पहिले पान | विदेश | पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यात 9 ठार

पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यात 9 ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

वायव्य पाकिस्तानातील निमलष्करी दलाच्या कॅम्पवर शनिवारी सकाळी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात नऊ सैनिक ठार, तर 17 जण जखमी झाले

पेशावर- वायव्य पाकिस्तानातील निमलष्करी दलाच्या कॅम्पवर शनिवारी सकाळी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात नऊ सैनिक ठार, तर 17 जण जखमी झाले. स्फोटकांनी भरलेली कार घेऊन एक दहशतवादी थेट या कॅम्पमध्ये घुसला आणि त्याने तिथे स्फोट घडवला. या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिका-यांनी वर्तवली आहे.

बन्नू शहरात निमलष्कराच्या दलाच्या जवानांचा सराव सुरू असतानाच लष्करी तळाच्या कार्यालयाबाहेर एका अज्ञात व्यक्तीने स्फोटकांनी भरलेली कार त्याठिकाणी आणून लावली होती. या स्फोटामुळे लष्करी तळाच्या एक मजली कार्यालयाचा काही भाग खाली कोसळला. आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले. 

निमलष्करी दलाचे जवळपास 300 सैनिक या कॅम्पमध्ये राहत होते. अफगणिस्तान सीमेपासून जवळच उत्तर वझिरीस्तानमध्ये हे लष्करी तळ आहे. तालिबानी आणि अल्-कायदाच्या दहशतवाद्यांसाठी उत्तर वझिरीस्तान ही ‘सुरक्षित’ जागा मानली जाते. तिथून 40 किलोमीटरवर हा कॅम्प सुरू होता. आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनीच हा हल्ला घडवून आणला असल्याची, शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0