पहिले पान | विदेश | सालेमचे प्रत्यार्पण बेकायदा- पोर्तुगाल न्यायालय

सालेमचे प्रत्यार्पण बेकायदा- पोर्तुगाल न्यायालय

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

कुख्यात गुंड अबू सालेमचे प्रत्यार्पण पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्याने सीबीआयला धक्का बसला आहे.

नवी दिल्ली- कुख्यात गुंड अबू सालेमच्या प्रत्यार्पण नियमांचा भंग केल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयाने ही कायम ठेवला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही भारताने सालेमच्या प्रत्यार्पण नियमांचा भंग केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सालेमची रवानगी पोर्तुगालमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताने अबु सालेमवर असे कोणतेही आरोप लावू नयेत ज्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा होईल किंवा 25 वर्षापेक्षा अधिक शिक्षा होईल, असे पोर्तुगालने त्याचे भारतात प्रत्यार्पण करताना म्हटले होते. मात्र त्यानंतरही भारतात त्याच्यावर असे खटले चालवण्यात येत असल्याचे पोर्तुगालच्या उच्च न्यायालयाने म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने सीबीआयला चांगलाच धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात सीबीआय आता पोर्तुगालच्या घटनापीठाकडे दाद मागणार आहे. सालेमवरील खटल्यांच्या सुनावणीवर याचा परिणाम होणार नसल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0