अनुज हत्येप्रकरणी पाचव्या आरोपीस अटक
इंग्लंडमधील मॅंचेस्टर येथे झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी एका 20 वर्षाच्या तरुणास अटक केली आहे.
लंडन- इंग्लंडमधील मॅंचेस्टर येथे झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी एका 20 वर्षाच्या तरुणास अटक केली आहे. मँचेस्टर पोलिसांनी यापूर्वी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना याप्रकरणी अटक केली आहे. या पाचही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
पुण्यात राहणारा 23 वर्षीय अनुज बिडवे हा लँकेस्टर विद्यापीठात मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत होता. ख्रिसमस साजरा करण्यासाठी तो आणि त्याचे नऊ मित्र सोमवारी मँचेस्टर शहरातील सॉल्फर्ड भागात गेले होते.
घरी परतत असताना दोन तरुणांनी त्याला वेळ विचारली. ती सांगण्यास अनुज बिडवेने नकार दिल्यावर त्याची हत्या करण्यात आली, असा दावा लंडन पोलिसांनी केला आहे. तसेच ही हत्या वर्णद्वेषातून झाल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे.
इंग्लंडमधल्या भारतीय उच्चायुक्तांनी आणि विदेश मंत्रालयाने या प्रकरणी संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा