चीनमध्ये एपल आयफोनच्या विक्रीला स्थगिती
चीनमध्ये आयफोन '4एस' घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकांनी दुकानावर अंडी फेकल्याने चीनमधील दुकानांत आयफोनची विक्री थांबवण्याचा निर्णय कंपनीच्या अधिका-यांनी घेतला आहे.
बीजिंग- चीनमध्ये आयफोन '4एस' घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना आयफोन न मिळाल्याने ग्राहकांनी दुकानावर अंडी फेकल्याने चीनमधील दुकानांत आयफोनची विक्री थांबवण्याचा निर्णय कंपनीच्या अधिका-यांनी घेतला आहे.
"आयफोन '4एस'ला सगळीकडे प्रचंड मागणी आहे आणि चीनमधील दुकानांमधील सर्व आयफोन आधीच विकले गेले आहेत" ,असे कंपनीच्या प्रवक्त्या कॅर्लीन वू यांनी सांगितले.
बीजिंगमधील सॅन्लितून येथील दुकानात आयफोन घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत असून सुरक्षेच्या कारणास्तव दुकान सुरू करू शकत नाही. त्यामुळे काही काळासाठी बीजिंग व शांघाय येथील रिटेल स्टोर्समध्ये आयफोनची विक्री बंद ठेवण्यात आल्याचेही वू यांनी स्पष्ट केले.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा