पहिले पान | विदेश | इजिप्तमध्ये फुटबॉल मॅचनंतर दंगल, 73 ठार

इजिप्तमध्ये फुटबॉल मॅचनंतर दंगल, 73 ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

इजिप्तमधील पोर्टसेड शहरात फुटबॉल सामना सुरू असतानाच प्रेक्षकांमधील दोन गटांत झालेल्या दंगलीत 74 जणांचा मृत्यू झाला.

कैरो-  इजिप्तमधील पोर्टसेड शहरात फुटबॉल सामना सुरू असतानाच प्रेक्षकांमधील दोन गटांत झालेल्या दंगलीत 74 जणांचा मृत्यू झाला, तर हजारो प्रेक्षक जखमी झाले. एकमेकांवर चाकूहल्ले आणि दगडफेक केल्याने ब-याच प्रेक्षकांचे बळी गेल्याचे पोलिसांनी सांगितले. इजिपत सरकारनेही ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगून तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

पोर्टसेड क्लब मैदानावर बुधवारी संध्याकाळी अल-आहली आणि अल-मासरी या दोन क्लबमध्ये फुटबॉल सामना झाला. या सामन्यात अल-मासरी क्लबने अल-आहली क्लबवर 3-1ने विजय मिळवला. सामना संपल्यानंतर काही प्रेक्षकांनी गोंधळ घालत एकमेकांवर बाटल्या फेकायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याची परिणती दंगलीत झाली. दोन्ही क्लबच्या चाहत्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली, काहींनी एकमेकांवर चाकूहल्ले केले, तर काहींनी मैदानावर आगी लावल्या.

इजिप्त सरकारने या घटनेची निंदा केली असून या घटनेचा ठपका पोलिसांवरच ठेवला आहे. पोलिस आणि येथील सुरक्षा रक्षकांनी दंगल शमवण्यासाठी काहीच प्रयत्न न केल्याचे इजिप्तच्या गृहमंत्र्यांनी सांगितले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0