पाकिस्तानात हिंसाचार;सात ठार
पाकिस्तानमध्ये नव्याने सुरु झालेल्या हिंसाचारात बलुचिस्तानच्या खासदाराची पत्नी व मुलीसह सात जणांची हत्या करण्यात आली.
कराची- पाकिस्तानमध्ये नव्याने सुरु झालेल्या हिंसाचारात बलुचिस्तानच्या खासदाराची पत्नी व मुलीसह सात जणांची हत्या करण्यात आली.
बलुचिस्तानातील सिबी प्रांतातील खासदार मीर बख्त यार डोमकी यांची पत्नी व मुलगी घरी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा कार चालकही ठार झाला.
"सध्या आमच्या महिलाही सुरक्षित नसून सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही. मात्र देव आम्हाला जरूर न्याय देईल" असे डोमकी म्हणाले.
यापूर्वीही पाकिस्तानात शिया पंथीयांमध्ये भडकलेल्या हिंसाचारात तीघांची हत्या झाली आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा