PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पाकिस्तान आणि चीनमध्ये रस्तेबांधणी करार पाकिस्तान आणि चीनमध्ये रस्तेबांधणी करार ================================================================================ पीटीआय on 09 July, 2010 05:45:00 PM बीजिंग- पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चीन सीमेलगत दोन महामार्ग बांधण्यासाठी पाकिस्तान आणि चीन यांच्यात शुक्रवारी करार झाला. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या चीन दौ-यादरम्यान या करारावर स्वाक्ष-या झाल्या. दोन्ही देशांना जोडणारा रेल्वेमार्ग पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील काराकोरम पर्वतरांगांमधून बांधण्याचाही पाकिस्तान आणि चीनचा विचार आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये महामार्ग बांधण्यासाठी 45 लाख रुपये खर्च येणार आहे. यातील 85 टक्के खर्च चीन, तर 15 खर्च पाकिस्तान उचलणार आहे. या महामार्गांमुळे दोन्ही देशांतील वाहतूक सुलभ होणार आहे. रेल्वेमार्गामुळेही दोन्ही देशांतील मालवाहतूक जलद होणार आहे. या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत भारताने अगोदरच चिंता व्यक्त केली आहे.