PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पाकिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात 28 ठार पाकिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात 28 ठार ================================================================================ पीटीआय on 01 September, 2010 10:30:00 PM कराची/लोहोर- पाकिस्तानमधील लाहोर शहरात शिया समुदयाच्या मिरवणुकीवर लक्ष्य करुन करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात 28 जण ठार झाले. तर 180 हून अधिक जखमी झाले आहेत. लाहोरमधील कर्बला गमय शाह इमामबाडा येथे पावणेसातच्या सुमारास दोन आत्मघाती हल्ले झाले. त्यानंतर सव्वासात वाजता तिसरा आणि शक्तीशाली आत्मघाती हल्ला झाला. मृतांमध्ये एका लहान मुलीचा आणि पोलिसाचा समावेश आहे. दुसरीकडे कराचीमध्ये ही शिया समुदायाच्या मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.