पहिले पान | विदेश | इरकामध्ये 14 साखळी बॉम्बस्फोट; 60 ठार

इरकामध्ये 14 साखळी बॉम्बस्फोट; 60 ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

राजकीय अस्थैर्याचे संकट असलेल्या इराकमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या 14 साखळी बॉम्बस्फोटांत किमान 60 नागरिक ठार झाले.

बगदाद- राजकीय अस्थैर्याचे संकट असलेल्या   इराकमध्ये गुरुवारी सकाळी  झालेल्या 14 साखळी बॉम्बस्फोटांत किमान 60 नागरिक ठार झाले. या साखळी बॉम्बस्फोटात  185 हून अधिक  नागरिक जबर जखमी झाले आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  

गुरुवारी  सकाळी राजधानी बगदादमधील बाब अल मुअतम आणि कराडा जिल्ह्यांत तर उत्तर इराकमधील शुला, शाब, तर पूर्वेकडील जद्ररियाह आणि दक्षिणेकडील अल अमील भागांत एकामागोमाग 14 साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 60 नागरिक ठार झाले तर 160 जण जखमी झाले आहेत.

पंतप्रधान नुरी अल मलिकी यांनी सून्नी उप राष्ट्राध्य तारिक अल हाशेमी यांनी सरकारी अधिका-यांना ठार मारण्यासाठी टोळी बाळगल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी सुन्नीपंथीय उपपंतप्रधान सलेह अल मुतलक यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 

शिया आणि सुन्नी पंथीयांमध्ये सुरू असलेला राजकीय तीव्र होत असतानाच देशात हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले आहेत.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
5.00