बॉम्बच्या अफवेमुळे विमानाचे लॅण्डिंग
रिओमधून पॅरीसकडे जाणारे विमान बॉम्बच्या अफवेमुळे तातडीने ब्राझीलमध्ये उतरवण्यात आले
रिओ दि जानेरिओ- रिओमधून पॅरीसकडे जाणारे एक विमान बॉम्बच्या अफवेमुळे तातडीने ब्राझीलमध्ये उतरवण्यात आले. विमानातील 405 प्रवासी आणि 18 कर्मचारी सुरक्षित आहेत, असे विमानतळाचे अधिकारी जॉर्ज अँड्रेड यांनी सांगितले.
विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याचा फोन करण्यात आला. या फोनमुळे विमान तातडीने उतरविण्यात आले. तसेच विमानतळही अर्धा तासासाठी बंद ठेवण्यात आले. विमानाची कसून तपासणी केल्यानंतर कोणतीही स्फोटके विमानात नसल्याचे जाहीर करण्यात आले.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा