PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बॉम्बच्या अफवेमुळे विमानाचे लॅण्डिंग बॉम्बच्या अफवेमुळे विमानाचे लॅण्डिंग ================================================================================ पीटीआय on 11 July, 2010 12:50:00 PM रिओ दि जानेरिओ- रिओमधून पॅरीसकडे जाणारे एक विमान बॉम्बच्या अफवेमुळे तातडीने ब्राझीलमध्ये उतरवण्यात आले. विमानातील 405 प्रवासी आणि 18 कर्मचारी सुरक्षित आहेत, असे विमानतळाचे अधिकारी जॉर्ज अँड्रेड यांनी सांगितले. विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याचा फोन करण्यात आला. या फोनमुळे विमान तातडीने उतरविण्यात आले. तसेच विमानतळही अर्धा तासासाठी बंद ठेवण्यात आले. विमानाची कसून तपासणी केल्यानंतर कोणतीही स्फोटके विमानात नसल्याचे जाहीर करण्यात आले.