पहिले पान | विदेश | सिरियातील संघर्षात 200 ठार

सिरियातील संघर्षात 200 ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

सिरियाच्या लष्कराने होम्स शहरातील हल्ल्यात सुमारे 200 जण ठार तर शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

बैरुट- सिरियाच्या लष्कराने होम्स शहरातील हल्ल्यात सुमारे 200 जण ठार तर शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. उठावादरम्यान लष्कराकडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सिरियाच्या सरकारने या वृत्ताचे खंडन केले आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासून लष्कराने केलेल्या हल्ल्यात अनेक महिला आणि मुलांसह 200 जण ठार झाल्याचे आंदोलकांनी सांगितले.

 

सिरियातील अराजकता संपवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत राष्ट्राध्यक्ष बशर असाद यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी अरब राष्ट्रांनी केली होती. त्या ठरावावर सुरक्षा परिषदेत मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर होम्स शहरावर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

 दरम्यान, सिरियामध्ये बाहेरील हस्तक्षेप नको, असे स्पष्ट करत सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाला रशियाने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री हिलरी क्लिंटन यांनी रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली. ही चर्चा विधायक झाल्याचे क्लिंटन यांनी सांगितले. सिरियातील अशांतता संपवण्यासाठी अमेरिका आणि रशिया दरम्यान न्यूयॉर्क येथे चर्चा सुरू ठेवण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0