पहिले पान | विदेश | सलमान रश्‍दी यांचा भारत दौरा रद्द

सलमान रश्‍दी यांचा भारत दौरा रद्द

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

प्रसिध्द भारतीय लेखक सलमान रश्‍दी यांनी आपला नियोजित भारत दौरा सुरक्षेच्या कारणावरून शुक्रवारी रद्द केला आहे.

जयपूर- प्रसिध्द भारतीय लेखक सलमान रश्‍दी यांनी आपला नियोजित भारत दौरा सुरक्षेच्या कारणावरून शुक्रवारी रद्द केला आहे.

जयपूरच्या वार्षिक साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून सलमान रश्‍दी उपस्थित राहणार होते. मात्र त्यांच्या भारत दौ-याला दारुल उलूम देवबंद सह अन्य मुस्लिम संघटनांनी तीव्र विरोध केला होता. रश्दी यांच्यावर आत्मघातकी हल्ला होऊ शकतो, अशी माहिती भारतीय गुप्तहेर खात्याला मिळाली आहे.

तसेच मुंबई आणि राजस्थान येथील गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार रश्दींना भारत भेटीत ठार मारण्याचा कट शिजला असून रश्दी यांना मारण्यासाठी मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील मारेक-यांना सुपारी देण्यात आल्याची आणि जयपूरला पोहचण्याआधीच त्यांचा खून करण्याचा कट आखल्याची टीप गुप्तचर विभागाला मिळाली आहे. हे माहित असताना जयपूर साहित्य महोत्सवात सहभागी होण्याचा अट्टाहास धरणे म्हणजे माझे कुटुंब, उत्सवाचे आयोजक आणि लेखक संप्रदाय या सगळ्यांप्रती बेजबाबदारपणाचे ठरेल अशी प्रतिक्रिया रश्दी यांनी व्यक्त केली आहे.

भारतात आपण येणार की नाही याबाबत राजस्थानातील आयोजकांच्या विनंतीवरून आपण मौन पाळले होते असे रश्दी म्हणाले. आता मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही भेट रद्द केल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र व्हिडीयो लिंकच्या माध्यमातून या महोत्सवात भाग घेणार असल्याचे रश्दी यांनी ट्विटरवर सांगितले.

तसेच रश्दी यांनी भारत दौरा रद्द केल्याची माहिती संयोजक संजय के. रॉय यांनी जाहीर केली आणि त्यांनी पाठवलेले पत्र संयोजकांनी वाचून दाखविले.

1988 मध्ये सॅटॅनिक व्हर्सेस ही कांदबरी रश्दी यांनी लिहिली. या कादंबरीत इस्लाम विरोधी लिखाण करण्यात आले असून हा धर्मद्रोह असल्याचा फतवा इराणच्या आयातुल्ला खोमेनी यांच्यासह जगभरातील अनेक मुस्लीम धर्मगुरूंनी काढला. तर रश्दी यांना ठार मारण्यात यावे असाही फतवा काढण्यात आला. त्यानंतर मूळ भारतीय वंशाच्या 65 वर्षीय रश्दींनी ब्रिटनमध्येच आसरा घेतला आहे. 

त्यांना मिडनाईट चिल्ड्रेन या पुस्तकासाठी प्रतिष्ठेचे मानले जाणारे बुकर प्राइसही मिळाले आहे.

रश्दी हे आमच्या धर्मासाठी गुन्हेगारच आहेत, काही राजकीय पक्षांनी त्यांच्या विरोधात निदर्शने करताना कदाचित गैरप्रकार होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी भारत दौरा रद्द केल्याचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया जमात-ए-इस्लामी हिंद या मुस्लिम संघटनेचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद सलिम यांनी दिली.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0