नायजेरियातील हिंसाचारात 150 ठार
नायजेरियातील कानो शहरात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांमध्ये 150 जण ठार झाले.
अबुजा- नायजेरियात शरिया कायदा लागू करावा, या मागणीसाठी बोको हाराम या कट्टर इस्लामी पंथाने शनिवारी कानो शहरातील अनेक ठिकाणी अत्यंत योजनाबद्ध रीतीने गोळीबार आणि बॉम्बस्फोटांची मालिका घडवली. या हिंसाचारात दिवसभरात 150 जण ठार झाले असून जखमींमध्ये काही भारतीयांचा समावेश आहे.
सरकारी इमारती आणि पोलिस ठाण्यांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात 24 तासांसाठी जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा