इटली जहाज अपघात प्रकरणी कॅप्टन अटकेत
इटलीतील गिग्लिओ या बेटाजवळ शुक्रवारी रात्री कोस्टा कॉनकोर्डिया हे अलिशान प्रवासी जहाज खडकाला धडकल्याने बुडाले. या अपघात प्रकरणी जहाजाचा कॅप्टन फ्रान्सिस्को शेटीनो याला अटक करण्यात आली आहे.
गिग्लिओ- इटलीतील गिग्लिओ या बेटाजवळ शुक्रवारी रात्री कोस्टा कॉनकोर्डिया हे अलिशान प्रवासी जहाज खडकाला धडकल्याने बुडाले. या अपघात प्रकरणी जहाजाचा कॅप्टन फ्रान्सिस्को शेटीनो याला अटक करण्यात आली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, अद्यापही 15 जण बेपत्ता आहेत.
या जहाजामध्ये 60 हून अधिक देशांचे चार हजार 234 प्रवासी होते. यापैकी अद्यापही 15 जण बेपत्ता असून ते इटली, अमेरिका आणि फ्रेंचचे नागरिक आहेत.
या जहाजातून प्रवास करीत असलेले 300 भारतीय नागरिक सुखरूप असल्याचे, इटलीतील भारतीय राजदूत देबब्रता साहा यांनी सांगितले.
या जहाजामध्ये वसईतील सात जण होते. त्यापैकी सहाजण सुखरुप असल्याचे समजते. मात्र वसईतील एकजण अद्याप बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा